Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Farmer killed on the spot: दुचाकीस भरधाव कंटेनरची जोरदार धडक; शेतकरी जागीच ठार

Farmer killed on the spot: दुचाकीस भरधाव कंटेनरची जोरदार धडक; शेतकरी जागीच ठार

Farmer killed on the spot

नांदुरा मार्गावरील बेलाड फाट्यावरील घटना
मलकापूर : पेट्रोल भरण्यासाठी वळण घेऊन जात असलेल्या दुचाकीला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने शेतकरी जागीच ठार झाला.ही घटना नांदुरा मार्गावरील बेलाड फाट्यावर १३ ऑक्टोबर रोजी घडली.शरद दशरथ नारखेडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद नारखेडे हे एमएच-२८-वाई-५१५४ क्रमांकाच्या दुचाकीवरून पत्नीसह नांदुरा तालुक्यातील डिघी येथे मामाकडे जात होते. मार्गात त्यांनी बेलाड फाट्याजवळ पत्नीला रस्त्याच्या कडेला उतरवून पेट्रोल पंपाकडे वळण घेतले, त्याच क्षणी एचआर-३८-एजी-४७३९ क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरचे चाक नारखेडे यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय प्रशांत श्रींगारे, प्रवीण धांदरे व सचिन पवार यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून कंटेनर ताब्यात घेतला. मात्र, चालक अपघातानंतर फरार झाला आहे.मृत शरद नारखेडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई-वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे झोडगा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top