Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

A speeding car :भरधाव कारची दुचाकीस धडक; दोघे जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

A speeding car : भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या स्विफ्ट डिझायर कारने मोटारसायकलला धडक देऊन दोघांना जखमी करून चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी देऊळगाव राजातील डॉ. शिंदे हॉस्पिटलसमोर घडली. या प्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A speeding car

अपघातानंतर कार चालकाने काढला घटनास्थळावरून पळ, देऊळगाव राजा शहरातील घटना

देऊळगाव राजा : भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या स्विफ्ट डिझायर कारने मोटारसायकलला धडक देऊन दोघांना जखमी करून चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी देऊळगाव राजातील डॉ. शिंदे हॉस्पिटलसमोर घडली. या प्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम लिंबाजी हिवाळे (वय २३, रा. माळीपुरा, देऊळगाव राजा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ कार्तिक लिंबाजी हिवाळे व त्याचा मित्र सुजित उद्धव झिने हे दोघे मोटारसायकल (क्रमांक MH-28-CD-1614) वरून पेट्रोल भरण्यासाठी डॉ. मुंढे हॉस्पिटलजवळील इंडियन ऑइल पेट्रोलपंपाकडे जात होते. त्यावेळी मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने मोटारसायकलला डाव्या बाजूने कट मारून धडक दिली.
या अपघातात कार्तिक हिवाळे याच्या चेहऱ्यावर, नाकाच्या हाडाला व हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच सुजित झिने हाही जखमी झाला आहे. अपघातानंतर संबंधित कारचालकाने मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा क्रमांक ६३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद सहाय्यक फौजदार नारायण गिते यांनी केली असून पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल सय्यद मुसा करीत आहेत. दरम्यान, अपघात घडवून फरार होणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top