Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

A leopard cub was injured :अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा जखमी; वनविभागाकडून तत्काळ रेस्क्यू

A leopard cub was injured : पातूर वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या नांदखेड फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार, २ जानेवारी रोजी सकाळी ६.४५ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

A leopard cub was injured

राहुल सोनोने
दिग्रस बू : पातूर वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या नांदखेड फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार, २ जानेवारी रोजी सकाळी ६.४५ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

जखमी बिबट्याचा बछडा हा नर जातीचा असून अंदाजे वय ६ ते ७ महिने आहे. प्राथमिक तपासणीत त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी.डी. पाटील, वनरक्षक ए.व्ही. राठोड, आर.के. बोराळे, जी.एस. गायगोल तसेच वनमजूर शेख उस्मान यांनी बछड्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

यानंतर जखमी बछड्याला तातडीने अकोला येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग यांच्या सल्ल्यानुसार अधिक चांगल्या उपचारांसाठी नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

उपवनसंरक्षक (प्रा.) सुमंत सोळंके, अकोला तसेच सहायक वनसंरक्षक (भ.व.) कु. नम्रता ताले यांच्या मार्गदर्शनाखाली बछड्याला तातडीने नागपूर येथे हलवण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top