A hectare of mango orchard : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तीन वर्षांपूर्वी मोठ्या परिश्रमाने उभी केलेली एक हेक्टर आंब्याची बाग आगीत जळून खाक झाली. गव्हाच्या काडाला लागलेली आग सत्यनारायण परमेश्वर तेजनकर यांच्या शेतातील बागेपर्यंत पोहचली. या आगीत तेजनकर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गव्हाच्या काडाला लागलेली आग पोहचली आंब्याच्या बागेपर्यंत
भागवत चव्हाण
कारेगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तीन वर्षांपूर्वी मोठ्या परिश्रमाने उभी केलेली एक हेक्टर आंब्याची बाग आगीत जळून खाक झाली. गव्हाच्या काडाला लागलेली आग सत्यनारायण परमेश्वर तेजनकर यांच्या शेतातील बागेपर्यंत पोहचली. या आगीत तेजनकर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
संग्रामपूर तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, ७ औषध विक्रेत्यांना नोटीस
वडगाव तेजन येथील सत्यनारायण परमेश्वर तेजनकर यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत एक हेक्टरवर आंब्याची बाग लावली होती. 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान सदर शेताच्या शेजारी असलेल्या सदाशिव चौगुले यांच्या शेतातील गव्हाच्या काडाला आग लागली. अचानक सुटलेल्या वादळामुळे ही आग आंबा लागवड अंतर्गत असलेल्या गव्हाचे काडाकडे आली. संपूर्ण आंब्याच्या बागेने काही क्षणात पेट घेतला.सदर परिस्थिती गावातील बऱ्याच गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सत्यनारायण तेजनकर यांच्या शेताकडे धाव घेऊन आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न केला.परंतु ही आग एवढी भयानक होती की आग विझवणे शक्य न झाल्यामुळे गावकऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडले. तसेच काही मिनिटातच सदर आंब्याची बाग जळून खाक झाली .त्यामध्ये त्या झाडांसाठी फिनोलेक्स कंपनीची विस एम एम ड्रिचिंग सुद्धा त्या आगीत जळून खाक झाले व स्पिंकलर संच सुद्धा जळून खाक झाले. रात्रंदिवस परिश्रम घेवून फुलवलेली बाग आगीत जळून खाक झाली.काही दिवसात या बागेला फळ लागून उत्पन्न सुरू होणार होते. मात्र, आगीत कष्टाने ऊलवलेली आग जळून खाक झाली.
अतिवृष्टीमुळेही झाले होते नुकसान
या आधि अतिवृष्टी व ढगफुटी मुळे शेतकरी सतीश तेजनकर यांच्या आंबेचे बागेचे नुकसान झाले होते.परंतु त्यांनी परत जिद्दीने झालेले नुकसान भरून काढले होते.वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे सदर शेतकरी सतीश तेजनकर यांच्यावर कर्जाचा भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब पंचनामा करून शेतकरी सतीश तेजनकर यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी जोर धरत आहे.तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शेतकऱ्यांना जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.निसर्गाच्या सततच्या कोपामुळे शेतकऱ्याचे जीवन अस्थिर होऊन शासनाने अशा पीडित शेतकऱ्याला तात्काळ मदत करणे गरजेचे आहे.
मी तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजने अंतर्गत कृषी विभागामार्फत एक हेक्टर आंबा फळबाग लागवड केलेली होती. अतिशय मेहनतीने ही आंब्याची बाग फुलविली सुद्धा होती.यावर्षी या बागेतील आंब्याला चांगल्या प्रकारे फळ लागलेली असतानाच माझ्या शेजारील शेतकरी सदाशिव सिताराम चौगुले यांनी त्यांच्या शेतातील गव्हाच्या काडाला ऐन वाऱ्या वावधनाच्या टायमात लावलेल्या आगीमुळे सदर आग ही माझ्या आंब्याच्या मळ्यातील अंतर्गत पीक असणाऱ्या गव्हाच्या काडाला लागली बऱ्याच गावकऱ्यांनी या आगीला विझवण्याचे अतोनात प्रयत्न केले. परंतु ते निष्फळ गेले व काही क्षणात मी रंगविलेल्या स्वप्नांचे व्हत्याचे नव्हते झाले. सदर घटनेमध्ये माझे दहा ते पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने व शासनाने सदर बाबीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन शेतकऱ्यांना वाचविण्याचे दृष्टीने मदत करावी हीच अपेक्षा.
सत्यनारायण परमेश्वर तेजनकर, शेतकरी

