Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

A 22-year-old man died :मळणी यंत्रासह ट्रॅक्टर उलटून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

A 22-year-old man died : मळणी यंत्रासह ट्रॅक्टर उलटल्याची घटना शनिवार, १८ जानेवारी रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास सहस्रमुळी ते अहिल्यानगर मार्गावर घडली. या भीषण अपघातात २२ वर्षीय युवकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सौरभ हरीचंद्र जाधव (वय २२, रा. सहस्रमुळी तांडा) असे मृत युवकाचे नाव आहे.

A 22-year-old man died
सहस्रमुळी–अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात

  मोताळा : मळणी यंत्रासह ट्रॅक्टर उलटल्याची घटना शनिवार, १८ जानेवारी रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास सहस्रमुळी ते अहिल्यानगर मार्गावर घडली. या भीषण अपघातात २२ वर्षीय युवकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सौरभ हरीचंद्र जाधव (वय २२, रा. सहस्रमुळी तांडा) असे मृत युवकाचे नाव आहे.

सौरभ जाधव हा अहिल्यानगर येथील सुरेश मांगो गोयकर यांच्याकडे कामाला होता. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी नऊ वाजता तो कामावर गेला होता. त्याच्यासोबत महेश मोतीसिंग जाधव हा देखील होता. दुपारी साडेअकरा वाजता सुरेश गोयकर यांनी त्यांच्या एम.एच. २८ / ए.जे. / ७२१९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला मळणी यंत्र जोडून सहस्रमुळी येथे शेतकऱ्यांची तूर मळण्यासाठी आणली होती. यावेळी सौरभ जाधव व महेश जाधव हे दोघेही ट्रॅक्टरवर होते.

गावातील रामचंद्र जाधव व करतार बस्सी यांच्या शेतातील तूर मळणीनंतर दुपारी तीन वाजता ट्रॅक्टर व मळणी यंत्र घेऊन ते अहिल्यानगरकडे निघाले. ट्रॅक्टर सुरेश गोयकर चालवत होते, तर सौरभ व महेश ट्रॅक्टरवर बसले होते. दरम्यान, दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास सहस्रमुळी तांडा येथील विलास माहुरे यांच्या शेताजवळ ट्रॅक्टर मळणी यंत्रासह अचानक उलटला.

या अपघातात सौरभ जाधव हा ट्रॅक्टरखाली दबला, तर सुरेश गोयकर व महेश जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच प्रकाश प्रभु जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सौरभ जाधव याचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. दरम्यान, जखमी सुरेश गोयकर व महेश जाधव यांना बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने खासगी वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top