Mahabreaking

[breaking_news]

Theft of agricultural materials : डोणगाव शिवारात शेती साहित्याची चोरी; ३८ हजार ७०० रुपयांचा माल लंपास

Theft of agricultural materials : डोणगाव भाग क्रमांक २ शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून मोटारपंपाच्या तांब्याच्या केबल, सोलर पंपाची केबल, स्टार्टर तसेच अन्य सिंचन साहित्य चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. १९ ते २० ऑगस्टदरम्यान घडलेल्या या घटनेत अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३८ हजार ७०० रुपयांचे साहित्य लंपास केले. याप्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा (FIR क्र. ०२७२/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

Theft

  शेतकऱ्यांच्या सिंचन साहित्यावर चोरट्यांचा डल्ला; भंगार व्यावसायिकांची चौकशी करण्याची मागणी

डोणगाव : डोणगाव भाग क्रमांक २ शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून मोटारपंपाच्या तांब्याच्या केबल, सोलर पंपाची केबल, स्टार्टर तसेच अन्य सिंचन साहित्य चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. १९ ते २० ऑगस्टदरम्यान घडलेल्या या घटनेत अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३८ हजार ७०० रुपयांचे साहित्य लंपास केले. याप्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा (FIR क्र. ०२७२/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र रावसाहेब आखाडे (वय ३६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतासह सुरेशराव आखाडे, राजकुमार धोंगडे, महावीर धोंगडे, विजय बोराळकर, आशिष धोंगडे, रमेश काळे, बळी काळे, संतोष मानवतकर, गौतम खोडके, कैलास काळे, भगवानराव विडोळे आणि विजय काळे यांच्या शेतातील केबल, सोलर पंप व स्टार्टर चोरीला गेले आहेत.

ऐन पिकांच्या सिंचनाच्या काळात शेती साहित्य चोरीला गेल्याने शेतकऱ्यांची पाणी देण्याची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पिकांचे सिंचन प्रभावित होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.

डोणगाव परिसरात यापूर्वीही शेती साहित्याच्या अनेक चोऱ्या झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पोलीस तपासाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी डोणगाव पोलिसांना निवेदन दिले. शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवावी, चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकांची चौकशी करावी आणि चोरीच्या घटनांमागील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

चोरीच्या घटनांना आळा घालून आरोपींचा लवकरात लवकर छडा न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top