Twenty years of friendship : वीस वर्षांपूर्वीच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत, श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदूरा येथे कला शाखा (सन 2005 बॅच) च्या माजी विद्यार्थ्यांनी “स्नेहसंमेलन २०२५” या भव्य कार्यक्रमात पुन्हा एकत्र येत जुन्या नात्यांना नव्याने रंग दिला. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या या दोन दिवसांच्या सोहळ्याला “दोन दिवसांची रंगत-संगत, दोन दिवसांची नाती” या भावनिक वातावरणाने वेढले होते.

श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदूरा येथे ‘माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन २०२५’ उत्साहात
नांदूरा : वीस वर्षांपूर्वीच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत, श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदूरा येथे कला शाखा (सन 2005 बॅच) च्या माजी विद्यार्थ्यांनी “स्नेहसंमेलन २०२५” या भव्य कार्यक्रमात पुन्हा एकत्र येत जुन्या नात्यांना नव्याने रंग दिला. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या या दोन दिवसांच्या सोहळ्याला “दोन दिवसांची रंगत-संगत, दोन दिवसांची नाती” या भावनिक वातावरणाने वेढले होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अंबादास कुलट (प्राचार्य, श्री. शिवाजी महाविद्यालय, अमरावती) होते. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. डॉ. हेमलता भावसार, प्रा. डॉ. सुमती भोगे-देशमुख, प्रा. श्री. रविकांत गावंडे, प्रा. संजय भोगे, प्रा. क्षिरसागर, प्रा. राजेश गावंडे, प्रा. डॉ. सचिन मुखमले, प्रा. लाहुडकर, तसेच एकनाथ अवचार, श्रीधर झाडोकार, सदाशिव गोल्डे, गजानन डांगे आणि विष्णु डावेराव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सत्कार समारंभ पार पडला. या वेळी दीपक अढाव, निलेश राठोड, संतोष पांडे, वृषाली गावंडे-शिंगोटे, अमोल भाकरे यांनी आपली मनोगते व्यक्त करून महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला.प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार मांडताना विद्यार्थी-शिक्षक नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. अंबादास कुलट यांनी माजी विद्यार्थ्यांच्या एकत्र येण्याच्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “२००५ बॅचमधील विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करत आहेत, हीच शिक्षणसंस्थेची खरी कमाई आहे.”
या वेळी सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘चंद्र आहे साक्षीला’ फेम गायक विनोद धनद्रव्ये यांच्या संगीत सादरीकरणाने वातावरण रंगून गेले. संगीत, गप्पा, हास्य आणि जुन्या आठवणींच्या ओघात महाविद्यालयाचा परिसर पुन्हा एकदा २० वर्षांपूर्वीच्या आनंदात न्हावून निघाला.
या यशस्वी कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. सचिन मुखमले आणि एकनाथ अवचार सर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. जयंत तायडे, सूत्रसंचालन दिनेश धामोडकर-पाटील, तर आभार सतीश हातळकर यांनी केले.
या संमेलनासाठी २००५ बॅचचे पुरुषोत्तम वारकर, विष्णु कोल्हे, कपिल काळे, विवेक नारखडे, महादेव वैतकर, राजू इंगळे, दीपक अढाव, उद्धव गावंडे, दत्ता लाहुडकर, निलेश राठोड, गजानन चिमकर, संदिप धामोडकर, आत्माराम नवले, सुदाम एकडे, राजू खराटे, अतुल नायसे, संजय सपकाळ, विनोद पाटील, सिध्दार्थ वाघ, वृषाली गावंडे-शिंगोटे, स्मिता बोरसे, वर्षा धामोडकर गावंडे यांच्यासह अनेक विद्यार्थी सहपरिवार उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अखेरीस “वीस वर्षांची आठवण… आणि पुन्हा एकत्र येण्याचा आनंद” अशा भावनेने सर्वांनी परस्परांना भेटी दिल्या आणि पुढील स्नेहसंमेलनात पुन्हा भेटण्याचा संकल्प व्यक्त केला.

