Mahabreaking

[breaking_news]

A cinematic chase : सिनेस्टाईल पाठलाग अन् पाच लाखांचा चेक वटविताना सापळा; सायबर पोलिसांनी ५२.७७ लाखांचा मुद्देमाल गोठवला

A cinematic chase : नांदुरा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणात बुलढाणा सायबर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आतापर्यंत ५२ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल व रक्कम गोठवली आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे करीत आहेत.

A cinematic chase

दोन कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीचा पर्दाफाश; बुलढाणा सायबर पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहाथ पकडले

बुलढाणा : नांदुरा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणात बुलढाणा सायबर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आतापर्यंत ५२ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल व रक्कम गोठवली आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे करीत आहेत.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सायबर पोलिसांच्या पथकाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यानगर येथून शुभम नांगल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी मुंबई येथून धनराज ऊर्फ रॉबीन विष्णाराम विष्णोई (वय २१, रा. जोधपूर, राजस्थान) आणि मुनाफ शेख अनवर शेख (वय २३, रा. अहिल्यानगर) यांचा ठाणे येथे सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पाळत ठेवली. हे दोन्ही आरोपी पाच लाख रुपयांचा चेक वटविण्यासाठी आल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

५२.७७ लाखांचा मुद्देमाल गोठवला

तपासादरम्यान NCCRP पोर्टलच्या माध्यमातून सुमारे ३१ लाख रुपये, आरोपी शुभम नांगलच्या गोल्ड लोन खात्यातील १४ लाख रुपये, तसेच आरोपी रॉबीन आणि मुनाफ हे पाच लाख रुपयांचा चेक वटविताना पकडण्यात आल्याने ती रक्कम जप्त करण्यात आली. याशिवाय आरोपींकडील Apple व Android मोबाईल फोन, अंदाजे १ लाख २७ हजार रुपये किमतीचे, तसेच MRM पोर्टलच्या माध्यमातून १ लाख ५० हजार रुपये, असा एकूण ५२ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल व रक्कम गोठविण्यात आली आहे.

दोन कोटी रुपये परत मिळविण्यासाठी प्रयत्न

ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन सायबर फसवणुकीत गेलेली तब्बल दोन कोटी रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी बुलढाणा सायबर पोलिसांचे अधिकारी व अंमलदार रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या फसवणुकीच्या तपासाची व्याप्ती राजस्थानपर्यंत पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या प्रकरणामागील संपूर्ण सायबर नेटवर्क उघड करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांचे पथक कामगिरीवर

पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या आदेशाने सायबर पोलीस स्टेशनचे ASI शकील खान, HC प्रशांत गावंडे, HC राजदीप वानखडे, HC विक्की खरात, HC राजु आडवे, PC कैलास ठोंबरे, PC राहुल इंगळे, PC क्षितीज तायडे आणि PC शुभम बोराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पथकाने गुन्ह्याशी संबंधित बँक खात्यांची माहिती, आरोपींचे Gmail आयडी आणि मोबाईल क्रमांकांची पडताळणी करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींना नांदुरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांच्याकडून सखोल चौकशी करून पुढील तपास केला जात आहे.

sp

डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

डिजिटल अरेस्ट, टास्क फ्रॉड आणि शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या संशयास्पद संदेश, फोन कॉल, लिंक किंवा आर्थिक व्यवहारांपासून सावध राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी केले आहे. कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी विलंब न करता NCCRP पोर्टल किंवा १९३० हेल्पलाइनवर तात्काळ तक्रार नोंदवावी, असेही तांबे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top