Mahabreaking

[breaking_news]

Vaishali Dongarjal :देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचा पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते सन्मान

Vaishali Dongarjal :अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासह महसूल प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचा १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे दत्त व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे व जिल्हाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

Vaishali Dongarjal

क्षेत्रीय स्तरावरील उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीची दखल; १५ ऑगस्टला बुलढाणा येथे गौरव

गजानन तिडके

देऊळगाव राजा : अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासह महसूल प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचा १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे दत्त व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे व जिल्हाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

Vaishali Dongarjal

महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निवड करण्यात आली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या मानाच्या यादीत देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचा समावेश आहे.

महसूल दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कामगिरीचा गौरव

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार दरवर्षी १ ऑगस्ट हा ‘महसूल दिन’ म्हणून साजरा केला जातो. महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी म्हणून गौरविण्याची परंपरा आहे. याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील विविध महसूल कार्यालयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली.

 

विविध संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश

जिल्हास्तरीय समितीच्या निवडीनुसार शरद पाटील, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच देऊळगाव राजा तहसील कार्यालयाच्या तहसीलदार श्रीमती वैशाली डोंगरजाळ आणि सिंदखेडराजा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार तुकाराम वराडे यांचाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मान

महसूल विभागाच्या क्षेत्रीय कामकाजात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला. ३१ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयासह संबंधित वरिष्ठ कार्यालयांच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्यासह जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.

 

तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन

तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचा जिल्हास्तरावर सन्मान झाल्याबद्दल देऊळगाव राजा तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यामध्ये संतोष मुंडे – निवासी नायब तहसीलदार, सायली जाधव – नायब तहसीलदार (महसूल), बालाजी कौशल्य – सहायक महसूल अधिकारी, बाळासाहेब गादेवाड – सहायक महसूल अधिकारी, सुनील बोर्डे – सहायक महसूल अधिकारी, दीपक गोरे – सहायक महसूल अधिकारी, उमेश गरकळ – सहायक महसूल अधिकारी, उज्वला मुंडे – सहाय्यक महसूल अधिकारी, पूजा सावळे – महसूल सहाय्यक, किशोर खांडेभराड – महसूल सहाय्यक, प्रशांत वाघ – महसूल सहाय्यक, रुपेश सोनवाल – महसूल सहाय्यक, शिवानंद आंधळे – महसूल सहाय्यक, चंद्रकांत इंगळे – महसूल सहाय्यक, पंजाबराव ताठे – चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अर्जुन सोनसळे – चतुर्थ श्रेणी कर्मचारी, तसेच समस्त कर्मचारी बांधव, तहसील कार्यालय देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा यांचा समावेश आहे.

वैशाली डोंगरजाळ यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीची जिल्हास्तरावर झालेली दखल ही देऊळगाव राजा तहसील कार्यालयाच्या कार्यक्षमतेला मिळालेली पावती मानली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top