Mahabreaking

[breaking_news]

Khadan police: गोवंश तस्करी करणाऱ्यांच्या खदान पोलिसांनी आवळल्या मुसक्या; दोन गोवंशांना जीवदान

Khadan police: अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालवाहू वाहनातून अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी सापळा रचून संशयित मालवाहू वाहन ताब्यात घेत त्यातील दोन गोवंशांची सुटका केली. या कारवाईत वाहनासह एकूण ३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khadan police

 कत्तलीसाठी निर्दयतेने कोंबून नेलेले दोन गोवंश पोलिसांनी सोडविले; ३.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला :  अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालवाहू वाहनातून अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी सापळा रचून संशयित मालवाहू वाहन ताब्यात घेत त्यातील दोन गोवंशांची सुटका केली. या कारवाईत वाहनासह एकूण ३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी खदान पोलिसांना एका मालवाहू वाहनातून गोवंश कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाळत ठेवून सापळा रचला. त्यावेळी एमएच ३० बीडी ०८०३ क्रमांकाचे संशयित मालवाहू वाहन पोलिसांनी थांबविले.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन गोवंश जातीची जनावरे आढळून आली. कत्तलीच्या उद्देशाने या जनावरांना निर्दयपणे बांधून वाहनात कोंबून वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ दोन्ही गोवंशांची सुटका करून त्यांना जीवदान दिले.

या प्रकरणी वाहनचालक मोहम्मद हनिफ शेख हबीब (रा. काजीपुरा, अकोला) आणि मोहम्मद असलम मोहम्मद रफीक (रा. गंगानगर, अकोला) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान वाहनासह एकूण ३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि परीक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल निलेश खंडारे, अभिमन्यू सदांशिव, भूषण मोरे, गिरीष वीर, शिवम दुबे, वैभव कस्तुरे यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top