Mahabreaking

[breaking_news]

Mujahid Patel : उर्दू शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मुजाहिद पटेल; उपाध्यक्षपदी जुबेर खान

Mujahid Patel : येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची नव्याने गठित करण्यात आली. पालक सभेत सर्वानुमते मुजाहिद पटेल यांची अध्यक्षपदी, तर जुबेर खान पठाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

Mujahid Patel

 मलकापूर पांग्रा येथील जि.प. उर्दू शाळेच्या समितीची निवड; मुजाहिद पटेल अध्यक्ष

मलकापूर पांग्रा : येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची नव्याने गठित करण्यात आली. पालक सभेत सर्वानुमते मुजाहिद पटेल यांची अध्यक्षपदी, तर जुबेर खान पठाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

photo

जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख गणेश डिघोळे यांच्या उपस्थितीत शाळेत पालक सभा घेण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. केंद्रप्रमुख गणेश डिघोळे यांनी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले. शाळेची पटसंख्या वाढविणे, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शाळेतील भौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी मुजाहिद पटेल, तर उपाध्यक्षपदी जुबेर खान पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

समितीच्या सदस्यपदी बुशराबी शेख सलीम, नवेद खान, रब्बानी खान, शेख फैजान, शेख सलीम बागवान, हिना परवीन, उबेद खान, रईस खान, आफशान खान, समीना बी सय्यद, इमरान शेख, शेख मुशीर शेख याकूब यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षणतज्ज्ञ म्हणून अफसाना बी. शेख आरिफ यांची निवड करण्यात आली.

यावेळी शेख रिजवान बागवान, रामेश्वर सोनकांबळे, परवेज खान, मुनीर पटेल, शावेद टेलर, आसिफ खान पठाण, शेख चांद, जावेद पठाण, रईस खान, इलियास कुरेशी यांच्यासह पालक व शिक्षकवर्ग उपस्थित होता.

शाळेचे मुख्याध्यापक शेख मुख्तार, शिक्षक शेख मुनीर, जावेद खान, युसूफ खान, रफीक खान, रशीद खान आणि मुस्कान मॅडम यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जावेद सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रफीक खान सर यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top