Bhante B. Sanghpal : जीवन जगत असताना बुद्धाने दिलेल्या मार्गाने चालाल तर मानवी जीवन यशस्वी व सुखाचे जाईल असे प्रतिपादन बुद्धा आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा समारोपीय प्रसंगी भंते बी संघापाल यांनी केले आहे.

राहुल सोनोने
दिग्रस : जीवन जगत असताना बुद्धाने दिलेल्या मार्गाने चालाल तर मानवी जीवन यशस्वी व सुखाचे जाईल असे प्रतिपादन बुद्धा आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा समारोपीय प्रसंगी भंते बी संघापाल यांनी केले आहे.
भारतीय बौद्ध महासभा पातुर तालुका अंतर्गत ग्राम शाखा दिग्रस खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचा शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक बोधिसत्व बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहाने पार पडला आहे .या ग्रंथाचा समारोपप्रसंगी सकाळी आठ वाजता बुद्ध वंदना व धम्म ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. तर सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान देवानंद इंगळे ,भावराव इंगळे यांनी ग्रंथाचे पठण व विश्लेषण करण्यात आले.त्यानंतर शिरला बुद्धभूमीचे संस्थापक अध्यक्ष भंते बी संघपाल यांनी उपस्थिती धम्म उपासक ,उपासिका यांना धम्म प्रवचन करण्यात आले आहे. त्यानंतर उपस्थित बौद्ध उपासिका ,जनसमुदाय यांना भोजनदान देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोधिसत्व बुद्धविविहार समिती दिग्रस खुर्द, महामाया महिला संघ दिग्रस खुर्द, तसेच जय बलभीम आखाडा, न्यू आनंद क्लब मंडळ दिग्रस खुर्द आदींनी सहकार्य केले आहे. स्थानिक महामाया महिला संघाकडून देवानंद इंगळे, भाऊराव इंगळे यांचे स्वागत करून वस्त्रदान करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्वांनी सहकार्य केले आहे.

