Ex-soldier from Wadegaon dies: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील माजी सैनिक रामदास पंढरी डोंगरे (वय ५८) यांचे शनिवारी (दि. १ नोव्हेंबर २०२५) पहाटेच्या सुमारास झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.

राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील माजी सैनिक रामदास पंढरी डोंगरे (वय ५८) यांचे शनिवारी (दि. १ नोव्हेंबर २०२५) पहाटेच्या सुमारास झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरे हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री जेवण करून झोपले होते. त्यांना दररोज पहाटे चार वाजता उठण्याची सवय होती; मात्र त्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत ते न उठल्याने त्यांच्या पत्नीने हाक मारली. प्रतिसाद न आल्याने डॉक्टरांना बोलावण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे निष्पन्न केले.
माजी सैनिक रामदास डोंगरे यांनी भारतीय सैन्यात तब्बल १७ वर्ष सेवा बजावली होती. सेवानिवृत्तीनंतर ते कुटुंबासमवेत वाडेगाव येथे वास्तव्यास होते. त्यांच्या देशसेवेचा वारसा त्यांनी पुढील पिढीकडे सोपविला असून त्यांच्या दोन्ही मुलांनी सैनिक म्हणून देशसेवा सुरू ठेवली आहे.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थ, नातेवाईक आणि माजी सैनिक संघटनांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

