Two killed: दाेन वेगवेगळ्या अपघातात अज्ञात वाहनाने दुचाकींना धडक दिल्याने दाेन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुलढाणा रस्त्यावरील २९ ऑक्टाेबर राेजी रात्री घडली.

अज्ञात वाहनांची दाेन दुचाकींना घडक : एका तासाच्या अंतरात घडले दाेन अपघात
मलकापूर : दाेन वेगवेगळ्या अपघातात अज्ञात वाहनाने दुचाकींना धडक दिल्याने दाेन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुलढाणा रस्त्यावरील २९ ऑक्टाेबर राेजी रात्री घडली.
मलकापूर शहरातील बुलढाणा रस्त्यावर असलेल्या टेंट हाऊससमोर अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार अविनाश मुरलीधर इंगळे (४५, रा. यशोधाम कॉलनी, मलकापूर) यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी प्रफुल्ल मुरलीधर इंगळे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निंबारी फाट्यानजीक बुलढाणा रोडवरील सागर लॉजिस्टिकजवळ अज्ञात वाहनाने दुचाकी क्रमांक एमएच २८ एए ८७११ ला धडक दिली. यामध्ये गौरव ओंकार नेमाडे (२२, रा. मोरखेड, ता. मलकापूर) याचा मृत्यू झाला, तर सोबतचा युवक ऋषिकेश गोपाळ सोळंके गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारांसाठी जळगाव खान्देश येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणात ऋषिकेश सीताराम नेमाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी बीट जमादार रवींद्र दळवी, सचिन पाटील पुढील तपास करीत अहेत.

