Mahabreaking

[breaking_news]

  Statewide loan waiver scheme :पंढरपुरातून राज्यव्यापी कर्जमाफीला प्रारंभ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे वितरण

Statewide loan waiver scheme :महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कर्जमाफी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर येथे झाला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती प्रमाणपत्रे तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत नव्याने पीककर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले.

Statewide loan waiver scheme

  ‘५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा’; कर्जमाफी, वीजबिल माफीसह शेतकरी हिताचे मोठे निर्णय जाहीर

पंढरपूर : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कर्जमाफी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर येथे झाला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती प्रमाणपत्रे तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत नव्याने पीककर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित सुधाकरपंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संकटात सापडलेल्या आणि कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शासनाने दिलेला शब्द पाळला आहे. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना महाराष्ट्रात राबविली जात आहे. राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, सहकार विभागाने पहिल्या टप्प्यात १७ लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. ३१ जुलैपूर्वी १३ हजार कोटी रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील याद्या प्रसिद्ध केल्या जातील. एकही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कृषीपंपांच्या ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या वीजबिलांची थकबाकी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, सुमारे ५० लाख शेतकऱ्यांचे ४८ हजार कोटी रुपयांचे वीजबिल माफ करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिसेंबर अथवा मार्चपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतीच्या आधुनिकीकरणावर भर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महा विस्तार’ हे ॲप राज्य शासनाने विकसित केले असून, आतापर्यंत सुमारे ५० लाख शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे. या ॲपद्वारे खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण, सिंचन, पीक व्यवस्थापन तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या बोलीभाषेत उपलब्ध होत आहे.

यावेळी पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी सर्व बाधितांचे शंभर टक्के समाधानकारक पुनर्वसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी शासनाकडून व्यापक उपाययोजना करण्यात आल्याचे सांगत पंढरपूरला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या कर्जमाफी, वीजमाफी आणि विविध कृषी योजनांचे कौतुक केले. कार्यक्रमात ‘इन्फ्रामॅन : देवेंद्र फडणवीस – मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाचे तसेच निवासी मूकबधिर विद्यालय, पंढरपूरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमास राज्यभरातील शेतकरी, वारकरी आणि कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top