Loan waiver scheme : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत अकोला जिल्ह्यात कर्जखात्यांची माहिती ऑनलाइन अपलोड करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६३ हजार ८८८ शेतकरी कर्जखात्यांची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, योजनेच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रितेशचंद्र साबळे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; आधार व अॅेग्रीस्टॅक नोंदणीचे आवाहन
अकोला : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत अकोला जिल्ह्यात कर्जखात्यांची माहिती ऑनलाइन अपलोड करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६३ हजार ८८८ शेतकरी कर्जखात्यांची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, योजनेच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रितेशचंद्र साबळे यांनी दिली.
यामध्ये अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २९ हजार ८९६ खातेदारांची माहिती अपलोड करण्यात आली असून, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या ३३ हजार ९९२ खातेदारांची माहितीही पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे.
राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा – १,३०७, बँक ऑफ इंडिया – ६९, बँक ऑफ महाराष्ट्र – ५,६७८, कॅनरा बँक – ७५७, सेंट्रल बँक ऑफ इंडिया – ९,५९९, इंडियन बँक – ८५८, इंडियन ओव्हरसीज बँक – १५४, पंजाब नॅशनल बँक – ५१, युनियन बँक ऑफ इंडिया – ३,३०३, आयसीआयसीआय बँक – २५१ आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक – ११,९६५ खातेदारांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे कर्जमुक्ती प्रक्रियेला गती मिळाली असून उर्वरित माहिती अपलोड करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय समितीच्या देखरेखीखाली बँकांकडूनही माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
आधार व अॅरग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जोडलेला असणे आणि अॅसग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी पूर्ण असणे अनिवार्य आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार जोडणी व अॅणग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन, सहकारी संस्था आणि बँका समन्वयाने काम करीत आहेत.

