Mahabreaking

[breaking_news]

Traffic congestion :वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका; मतदार संघातील प्रमुख रस्ते रुंद करा, कायंदे यांची सरकारकडे मागणी

Traffic congestion : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांची रुंदी वाढविण्याची मागणी आमदार मनोज कायंदे यांनी ९ जुलै रोजी विधानसभेत जोरदारपणे मांडली. मतदारसंघातील वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

kayande
रस्ते रुंद झाल्यास विकासाला वेग; सिंदखेडराजा मतदारसंघाचा प्रश्न आमदार मनोज कायंदे यांनी सभागृहात मांडला

गजानन तिडके
देऊळगाव राजा : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांची रुंदी वाढविण्याची मागणी आमदार मनोज कायंदे यांनी ९ जुलै रोजी विधानसभेत जोरदारपणे मांडली. मतदारसंघातील वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघातील विविध प्रश्न उपस्थित करताना आमदार कायंदे यांनी रस्त्यांच्या प्रश्नावर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, सिंदखेडराजा मतदारसंघात सुमारे ५४० किलोमीटर लांबीचे विविध प्रमुख रस्ते आहेत. मात्र, अनेक रस्त्यांची रुंदी अपुरी असल्याने वाहतुकीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. वाहनांची वाढती संख्या, ग्रामीण आणि शहरी भागातील संपर्क वाढणे, तसेच अपघातांचे वाढते प्रमाण पाहता या रस्त्यांचे रुंदीकरण करणे अत्यावश्यक झाले आहे.
कायंदे यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडले की, रस्त्यांची सध्याची स्थिती केवळ नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळा ठरत नाही, तर आपत्कालीन सेवांनाही त्याचा फटका बसत आहे. अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी वाढते, प्रवासाचा वेळ वाढतो आणि अपघातांचा धोका अधिक तीव्र होतो. त्यामुळे शासनाने सिंदखेडराजा मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करून टप्प्याटप्प्याने रुंदीकरणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यास वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होईल, असा दावा करत कायंदे यांनी या कामामुळे मतदारसंघाच्या विकासालाही गती मिळेल, असे नमूद केले. चांगल्या रस्त्यांमुळे व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य सेवा आणि ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था मजबूत होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असेही त्यांनी सभागृहात सांगितले.
मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आमदार म्हणून मनोज कायंदे यांनी पुन्हा एकदा रस्त्यांच्या प्रश्नाला अधोरेखित केले आहे. आता शासन या मागणीची कितपत दखल घेते आणि सिंदखेडराजा मतदारसंघातील रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत कोणता निर्णय घेते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top