Car driver robbed : राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा परिसरात कार चालकाला अज्ञात भामट्यांनी लुटल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे दहाच्या सुमारास घडली. लघुशंकेसाठी कार थांबवली असता दोन अज्ञात व्यक्तींनी कारचा काच फोडून गळ्यातील सोन्याची चैन आणि रोकड असा एकूण ७२ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून पसार झाले.
२० ग्रॅम सोन्याची चैन आणि १२ हजार रुपयांची रोकड लंपास :चाेरट्यांचा शाेध सुरू
संजय तायडे
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा परिसरात कार चालकाला अज्ञात भामट्यांनी लुटल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे दहाच्या सुमारास घडली. लघुशंकेसाठी कार थांबवली असता दोन अज्ञात व्यक्तींनी कारचा काच फोडून गळ्यातील सोन्याची चैन आणि रोकड असा एकूण ७२ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून पसार झाले.
फिर्यादी अजय वाधवानी (रा. अकोला) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या कार क्रमांक एमएच-३० एझेड-७६८२ ने प्रवास करत होते. वाशिबा शिवारात त्यांनी लघुशंकेसाठी कार थांबवली असता दोन अज्ञात भामट्यांनी अचानक हल्ला करून २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत सुमारे ₹६०,०००) आणि ₹१२,००० रोख रक्कम जबरदस्तीने घेतली व घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात अजय वाधवानी यांनी २५ ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदवली, त्यानुसार अज्ञात दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, उपनिरीक्षक मनोज उघडे, एएसआय सतीश हाडोळे, सुदीप राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील तांत्रिक पुरावे गोळा करून चोरट्यांचा शोध मोहीम हाती घेतली आहे. पुढील तपास बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे.


