Mahabreaking

[breaking_news]

Allegation of hurting :धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; देऊळगाव राजात मुस्लिम समाजाचे पोलीस ठाण्यात निवेदन

Allegation of hurting : सोशल मीडियावर इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह, निंदनीय आणि द्वेषयुक्त वक्तव्य केल्याप्रकरणी  नाझिया इलाही खान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देऊळगाव राजा येथील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने केली. याविषयी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधित महिलेविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Allegation of hurting

 सोशल मीडियावरील कथित वक्तव्यावरून कारवाईची मागणी; देऊळगाव राजात तक्रार दाखल

गजानन तिडके

देऊळगाव राजा : सोशल मीडियावर इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह, निंदनीय आणि द्वेषयुक्त वक्तव्य केल्याप्रकरणी  नाझिया इलाही खान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देऊळगाव राजा येथील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने केली. याविषयी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधित महिलेविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या प्रकरणी शेख गौस शेख जहीरोद्दीन, शेख मोहसिन शेख लाल, वसीम शाह सुभान शाह, रवि रामदास पिंपळे यांच्यासह अन्य नागरिकांनी पोलीस निरीक्षक, देऊळगाव राजा पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नाझिया इलाही खान (रा. घोगारी मोहल्ला, पायधुनी, मुंबई) यांच्यावर समाजमाध्यमांवर इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वक्तव्य सोशल मीडियावरील विविध माध्यमांवर, जसे की यूट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅ्प आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या मजकुरामुळे देऊळगाव राजा शहरासह परिसरातील मुस्लिम समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही हा प्रकार गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की, संबंधित वक्तव्य हे केवळ वैयक्तिक मत नसून समाजात तेढ, द्वेष आणि वैमनस्य निर्माण करण्याच्या हेतूने केले गेले आहे. हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) हे इस्लाम धर्मियांच्या श्रद्धेचे केंद्र असून, त्यांच्याविषयी कथितरीत्या करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. तसेच, अशा प्रकारच्या पोस्ट आणि वक्तव्यांमुळे समाजातील विविध धार्मिक गटांमध्ये गैरसमज, तणाव आणि शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

तक्रारदारांनी पोलीस प्रशासनाकडे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी करत, संबंधित व्यक्तीविरोधात विविध कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या निवेदनावर अशफाक शाह, अनवर खान (नगरसेवक), जाहीर खान, मोहसीन शेख, वसीम शाह, रवी पिंपळे, आकीब कोटकर, नासेर शाह, शेख सलमान, शेख अलीम, आमीर खान, शोहेब शाह, आयान अली, अब्दुल शाह, राजिक शाह, अरबाज मिर्झा आदींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top