Ganganagar area: शहरातील वाशिम बायपास रोडलगत असलेल्या गंगानगर व गोवर्धननगर भाग क्रमांक २ (मॉर्डन इंग्लिश स्कूल रोड परिसर) येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नसल्याने सर्वत्र सांडपाण्याचे डबके साचले असून, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये आजारपणाचे प्रमाण वाढले आहे.

नागरिकांचे आराेग्य धाेक्यात : अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधींचे हाेतेय दुर्लक्ष
अकोला :शहरातील वाशिम बायपास रोडलगत असलेल्या गंगानगर व गोवर्धननगर भाग क्रमांक २ (मॉर्डन इंग्लिश स्कूल रोड परिसर) येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नसल्याने सर्वत्र सांडपाण्याचे डबके साचले असून, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये आजारपणाचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या भागात कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. पूर्वी हा परिसर ग्रामपंचायत भाैरदच्या हद्दीत होता, पण त्यावेळीही विकासकामांकडे दुर्लक्ष झाले. नंतर या भागाचा मनपामध्ये समावेश झाला, तरीही परिस्थितीत बदल झालेला नाही. नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागण्यांनंतरही रस्ते व सांडपाणी नाले बांधणीचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही.
स्थानिकांचा आरोप आहे की, निवडणुकीच्या काळात नगरसेवक व आमदार केवळ मतदानासाठी येतात; मात्र निवडून आल्यानंतर गंगानगरकडे पाठ फिरवतात. पश्चिम मतदारसंघातील आमदार साजिद खान पठाण यांनाही नागरिकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले, पण त्यांनीही या भागातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.
या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला असून, आता मनपा आयुक्तांनी तातडीने गंगानगर व गोवर्धननगर परिसरातील सांडपाणी व रस्त्यांच्या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास मनपा समाेर आंदाेलन करण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

