House burglary: डोणगाव : डाेणगाव पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथे चाेरट्यांनी बंद घर फाेडून ५० हजार रुपये लंपास केले. बाहेरगाववरून परत आल्यानंतर ही घटना २५ ऑक्टाेबर राेजी उघडकीस आली.

बंद असलेली घरे चाेरट्यांच्या रडारवर : गुन्हा दाखल
डोणगाव : डाेणगाव पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथे चाेरट्यांनी बंद घर फाेडून ५० हजार रुपये लंपास केले. बाहेरगाववरून परत आल्यानंतर ही घटना २५ ऑक्टाेबर राेजी उघडकीस आली.
शेलगाव देशमुख येथील फिर्यादी निर्मला रामभाऊ नवले या १८ आक्टोबर ते २५ आक्टोबरला दिवाळी निमित्त मुलीकडे मेहकर येथे गेल्या हाेत्या. अज्ञात चाेरट्याने त्यांच्या घराचे कुलूप ताेडून प्रवेश केला. तसेच घरात ठेवलेली लोंखडी पेटी व त्यात ठेवलेले ५० हजार रुपये असे लंपास केले. या प्रकरणी निर्मला रामभाऊ नवले यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा येथून फॉरेन्सिक टीम व डॉग स्क्वाट बोलावण्यात आले हाेते. पुढील तपास डाेणगाव पाेलीस करीत आहेत.

