Young man : अकोला जिल्ह्यातील मासा येथील रहिवासी असलेला ३५ वर्षीय तरुण सांगली जिल्ह्यातील सावळी येथे कामावर असताना गावी जाण्यासाठी निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ कुंदन लालाजी दवंडे यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

‘गावी जातो’ असे सांगून निघाला, पण घरीच पोहोचला नाही; तरुणाचा शोध सुरू
बोरगाव मंजू : अकोला जिल्ह्यातील मासा येथील रहिवासी असलेला ३५ वर्षीय तरुण सांगली जिल्ह्यातील सावळी येथे कामावर असताना गावी जाण्यासाठी निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ कुंदन लालाजी दवंडे यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

तक्रारीनुसार, गजानन लालाजी दवंडे (वय ३५) हे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील हनुमाननगर, सावळी येथील रनवीर ॲग्रो फूड्स कंपनीत काम करत होते. ते आपल्या मित्र शिवदास बाळकृष्ण स्वर्गीय यांच्यासोबत कंपनीच्या निवासस्थानी राहत होते.
गजानन हे नेहमी मित्राच्या मोबाईलवरून कुटुंबीयांशी संपर्क साधत असत. मात्र, काही दिवस संपर्क न झाल्याने त्यांचा भाऊ कुंदन दवंडे यांनी २४ जून रोजी शिवदास यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी गजानन यांनी १९ जून रोजी सकाळी ९ वाजता “मी गावी जात आहे,” असे सांगून कंपनीच्या निवासस्थानातून निघाल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर गजानन घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांसह सांगली, मिरज, कुपवाड, बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
गजानन लालाजी दवंडे, वय ३५ वर्षे, मूळ रा. मासा, ता. अकोला, जि. अकोला. उंची सुमारे ५ फूट ६ इंच, मध्यम बांधा, सावळा वर्ण, काळे केस, बारीक दाढी-मिशी, सरळ नाक, उभट चेहरा. अंगात पांढऱ्या रंगाचा फुलबाह्यांचा टी-शर्ट व काळ्या रंगाची पँट होती. ते मराठी भाषा बोलतात. या व्यक्तीबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

