Mahabreaking

[breaking_news]

Hit-and-run :आसोला फाट्यावर हिट अँड रन; अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

Hit-and-run : जालना येथून आपल्या गावी परतत असलेल्या २७ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ जून रोजी रात्री असोला फाटा येथील नागरे पेट्रोल पंपाजवळ घडली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश गजानन भागीले (वय २७, रा. टाकरखेड भागीले) असे मृतक युवकाचे नाव आहे.

Hit-and-run
जालन्यावरून घरी परतताना काळाचा घाला; अज्ञात वाहनचालक फरार, पोलिसांकडून शोध सुरू

गजानन तिडके
देऊळगाव राजा : जालना येथून आपल्या गावी परतत असलेल्या २७ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ जून रोजी रात्री असोला फाटा येथील नागरे पेट्रोल पंपाजवळ घडली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश गजानन भागीले (वय २७, रा. टाकरखेड भागीले) असे मृतक युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेश गजानन भागीले हे २७ जून रोजी रात्री जालना येथून आपल्या एमएच-२०-एपी-२५४५ क्रमांकाच्या दुचाकीने टाकरखेड भागीले येथे परतत होते. रात्री सुमारे ९.४० वाजताच्या सुमारास असोला फाटा येथील नागरे पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात ऋषीकेश भागीले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वाहनचालकाने कोणतीही मदत न करता वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या ऋषीकेश भागीले यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मृताचे मावसभाऊ रावसाहेब गणेश डोके (वय ४३, व्यवसाय – शेती, रा. रोहणा, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद मुसा बेग यांनी केली असून,पुढील तपास ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहेत. अपघात करणाऱ्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top