woman dies :दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने महिला जागीच ठार झाली तर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना वाडेगाव पोलीस चौकी हद्दीतील नकशी–भरतपूर परिसरात बुधवारी (दि. २४) दुपारी घडली. समीनाबी आशिक शाह (वय २५) असे मृतक महिलेचे नाव आहे.

अकोला ते वाडेगाव रस्त्यावरील भरतपूर नजीकची घटना
राहुल सोनोने
वाडेगाव: दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने महिला जागीच ठार झाली तर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना वाडेगाव पोलीस चौकी हद्दीतील नकशी–भरतपूर परिसरात बुधवारी (दि. २४) दुपारी घडली. समीनाबी आशिक शाह (वय २५) असे मृतक महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पातूर तालुक्यातील पिंपखुटा येथील आशिक शाह हे पत्नी समीनाबी आशिक शाह व दोन मुलांसह दुचाकीने अकोल्याकडे जात होते. दरम्यान, अकोला–वाडेगाव मार्गावरील नकशी–भरतपूर दरम्यान दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीची त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली.
या भीषण अपघातात समीनाबी आशिक शाह यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत असलेली दोन मुले गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दुसऱ्या दुचाकीवरील चालकही गंभीर जखमी झाला असून त्याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशन व वाडेगाव पोलीस चौकीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी अकोला येथे हलविले तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला.या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

