Mahabreaking

[breaking_news]

Storms fury :वादळाचा घाला; धावत्या दुचाकीवर झाड कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Storms fury : कानशिवनी शिवारात मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड अचानक धावत्या दुचाकीवर कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सतीश भरतरी चिलवंते (वय ४०, रा. कानशिवनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Storms fury

कानशिवनी शिवारातील हृदयद्रावक घटना; कुटुंबाचा आधार हरपला

बोरगाव मंजू  : कानशिवनी शिवारात मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड अचानक धावत्या दुचाकीवर कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सतीश भरतरी चिलवंते (वय ४०, रा. कानशिवनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने त्यांच्या कापूस पिकाचे मोठे नुकसान होत होते. पिकाचे संरक्षण करण्यासाठी आणि शेताची रखवाली करण्याच्या उद्देशाने सतीश चिलवंते हे मंगळवारी सायंकाळी दुचाकीने शेताकडे जात होते.

याच दरम्यान वादळी वाऱ्याचा जोर वाढला आणि रस्त्यालगत असलेले एक मोठे झाड अचानक त्यांच्या दुचाकीवर कोसळले. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि बुधवारी, २४ जून रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

घराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सांभाळणारा कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने चिलवंते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतातील पीक वाचविण्यासाठी घराबाहेर पडलेला शेतकरी नियतीच्या क्रूर खेळाचा बळी ठरल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात व नंतर त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली. सतीश चिलवंते यांच्या निधनाने कानशिवनी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वादळाच्या एका तडाख्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top