Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal two-wheeler accident :कातखेड–विझोरा मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी Benefit of revenue services :महसूल सेवांचा लाभ गावागावात : बार्शीटाकळीत महाराजस्व शिबिरांना प्रारंभ Brother kills brother :कौटुंबिक वादाचा भीषण शेवट : सुटाळा बु. येथे भावानेच भावाचा घेतला जीव Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Fatal two-wheeler accident :कातखेड–विझोरा मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी Benefit of revenue services :महसूल सेवांचा लाभ गावागावात : बार्शीटाकळीत महाराजस्व शिबिरांना प्रारंभ Brother kills brother :कौटुंबिक वादाचा भीषण शेवट : सुटाळा बु. येथे भावानेच भावाचा घेतला जीव Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त

Burglars break into houses: भर दिवसा घरफोडी करणारा चाेरटा गजाआड; बोरगाव मंजू पोलिसांची धडक कारवाई 

Burglars break into houses: कानशिवणी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या अट्टल घरफोड्या सराईत गुन्हेगाराला बोरगाव मंजू पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गजाआड करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे. 

Burglars break into houses

सोन्याचे दागिने व मुद्देमाल हस्तगत : कानशिवणीत घडली हाेती घटना
संजय तायडे 
बोरगाव मंजू : कानशिवणी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या अट्टल घरफोड्या सराईत गुन्हेगाराला बोरगाव मंजू पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गजाआड करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे.
घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी कानशिवणी येथील रहिवासी किसन वसंतराव तवाडे हे खाजगी व्यवसायानिमित्त आपल्या कुटुंबासह गावातील आठवडी बाजारात गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाट उचकटले. त्यातून २०.७८ ग्रॅम सोन्याची पट्टा (किंमत ₹१,०४,४६९) आणि ५.२७ ग्रॅम सोन्याचे पेंडॉल (किंमत ₹२९,५८३) असा एकूण ₹१,३४,०५२ किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. तवाडे कुटुंब घरी परतल्यावर  चोरीचा प्रकार  उघडकीस आला. त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांच्या शोधाला सुरुवात केली.
कोणताही धागादोरा नसतानाही जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, पोलीस उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकरराव शेळके आणि निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबविण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, कॉन्स्टेबल आकाश जंजाळ, अजिंक्य हळदे, गोपाल ठोंबरे आणि स्वप्निल दामोदर यांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे संशयित अट्टल घरफोड्या सुरेश गजानन कोरे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top