Triple accident: मुर्तिजापूर-दर्यापूर मार्गावर पायटांगी बसथांब्याजवळ झालेल्या तिहेरी भीषण अपघातात एक जण ठार तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. २३) रात्री आठच्या दरम्यान घडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

अकोला जिल्ह्यात अपघातांची मालिका कायम
संजय तायडे
बोरगाव मंजू : मुर्तिजापूर-दर्यापूर मार्गावर पायटांगी बसथांब्याजवळ झालेल्या तिहेरी भीषण अपघातात एक जण ठार तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. २३) रात्री आठच्या दरम्यान घडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्तिजापूर कडून दर्यापूर कडे ट्रॅक्टर क्रमांक एमएच २५ १९४८जात हाेता. यावेळी पाठीमागून प्रवासी वाहु कार क्रमांक एमएच 30 बी एल ७६०० ने समोरच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरवर धडकली,तर रस्त्याच्या कडेला तिन पलट्या घेत कोसळली. याच दरम्यान दर्यापूर कडून प्रवासी वाहतूक करणारा ऑटो क्रमांक एमएच २७ बी डब्ल्यू ८०७५ कारला धडकला. या तिहेरी अपघातात एक अनाेळखी प्रवासी ठार झाला तर ९ प्रवासी गंभीर जखमी झाले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएस आय वानखडे मेजर,एएस आय दिपक कानडे, हेडकॉन्स्टेबल संजय खंडारे, ज्ञानेश्वर लटके, गणेश ठाकरे,खाडे मेजर सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ मार्गावर वाहतूक विस्कळित झाली होती, पोलिसांनी सुरळीत केली,तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकांनी मदत केली, नेमका अपघात कसा झाला हे मात्र समजू शकले नाही, पुढील तपास मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

