Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

Tulsabai Kaval School : इंडियन टॅलेंट ओलंपियाडमध्ये तुळसाबाई कावल विद्यालयाला गोल्ड मेडल

Tulsabai Kaval School :तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातुर येथे मागील सत्र (२०२४-२५) मध्ये इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शाळेला उत्कृष्ट यश मिळत गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे.

Tulsabai Kaval School

पातुर : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातुर येथे मागील सत्र (२०२४-२५) मध्ये इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शाळेला उत्कृष्ट यश मिळत गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे.
या परीक्षेत इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांचा समावेश होता. विद्यालयातील एकूण २५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये आयुषी दीपक पाठक हिने इंग्रजी, गणित व विज्ञान या तिन्ही विषयांत क्लास टॉपर ठरत गोल्ड मेडल, सन्मानचिन्ह तसेच रु. १२०० चा धनादेश मिळवला. याशिवाय सई संदीप तेजनकर, गौरी विनोद बगळेकर, मैथिली विशाल वाडी, आदित्य वसंता गवळी, गौरव विलास वडकुटे आणि अर्जुन राजेश वानखडे या विद्यार्थ्यांनीही प्रत्येकी विषयात गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल पटकावले.
विद्यालयाच्या या उत्कृष्ट यशासाठी इंडियन टॅलेंट ओलंपियाडतर्फे शाळेला गोल्ड मेडल बहाल करण्यात आले. तसेच इंग्रजी विषयाच्या ए.आर. बैस मॅडम, गणिताचे कुणाल विंचुरकर सर व विज्ञान विषयाच्या एस.एस. अंधारे मॅडम यांना त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बेरार एज्युकेशन सोसायटी पातुरचे व्यवस्थापक  विजयसिंह गहिलोत, सचिव  स्नेह प्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमानसिंह गहिलोत, उपप्राचार्य एस.बी. चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर.एस. ढेंगे, पर्यवेक्षिका पी.एम. कारस्कर व पर्यवेक्षक एस.आर. मुखाडे सर यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन ए.आर. बैस, एस.एस. अंधारे आणि कुणाल विंचुरकर सर यांचे लाभले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top