Kirtan Sudhakar : साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांना ‘कीर्तन सुधाकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान रविवार, दि. १४ जून रोजी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

साखरखेर्ड्याच्या मठाधिपतींचा वाराणसीत गौरव; उद्या होणार सन्मान
साखरखेर्डा: साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांना ‘कीर्तन सुधाकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान रविवार, दि. १४ जून रोजी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
परमपूज्य श्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी तसेच परमपूज्य श्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या आदेशानुसार श्री जगद्गुरू विश्वाराध्य ज्ञानसिंहासन जंगमवाडी मठ, वाराणसी यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
दि. १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता श्री जगद्गुरू पंचाचार्य यांच्या सान्निध्यात बृहन्मठ, होटगी (अक्कलकोट रोड) येथील वीरतपस्वी मठात आयोजित विशेष समारंभात सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांचा गौरव करण्यात येणार आहे.
सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी धार्मिक, आध्यात्मिक व कीर्तन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याची माहिती वाराणसी येथील जंगमवाडी मठाचे प्रबंधक आर. के. स्वामी यांनी दिली.

