Mahabreaking

[breaking_news]

   Cash worth ₹2.28 lakh stolen :घरातील कपाटातून २.२८ लाखांची रोकड लंपास; दोन अल्पवयीन मुलींवर गुन्हा

Cash worth ₹2.28 lakh stolen : शहरातील राजेश्वर नगर भागातील एका घरातून तब्बल २ लाख २८ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका खाजगी संस्थेत कार्यरत असलेल्या दांपत्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Cash worth ₹2.28 lakh stolen

 राजेश्वर नगरात धक्कादायक चोरी; टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने कपाट फोडल्याचा संशय

बुलढाणा : शहरातील राजेश्वर नगर भागातील एका घरातून तब्बल २ लाख २८ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका खाजगी संस्थेत कार्यरत असलेल्या दांपत्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

वनिता प्रमोद गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे गोडे कॉलेज मार्गावरील राजेश्वर नगर येथे घर असून त्या पती प्रमोद गावंडे व दोन मुलींसह राहतात. नोकरीमुळे दोघेही सकाळी सुमारे ९ वाजता घराबाहेर पडतात. मोठी मुलगी शिकवणीसाठी जाते, तर लहान मुलगी आणि तिचा चुलत भाऊ पोहण्यासाठी जात असतात.

गावंडे कुटुंब वरच्या मजल्यावर राहत असून खालच्या मजल्यावरील चार खोल्या भाड्याने दिलेल्या आहेत. त्यापैकी दोन खोल्यांमध्ये एक कुटुंब, तर उर्वरित खोल्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि दोन अल्पवयीन मुली राहत होत्या. संबंधित दोन मुली घरातील मुलांसोबत खेळण्यासाठी व टीव्ही पाहण्यासाठी नेहमी येत असत.

घरात फर्निचरचे काम सुरू असल्याने वनिता गावंडे यांच्या भावाने कामासाठी दिलेले दीड लाख रुपये तसेच घरभाड्यातून जमा झालेले ७८ हजार रुपये, असे एकूण २ लाख २८ हजार रुपये कपाटातील ड्रॉवरमध्ये लॉक करून ठेवले होते. ६ जून रोजी फर्निचर कामगारांना पैसे देण्यासाठी कपाट उघडले असता ती रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.

दोन संशयित मुलींवर गुन्हा दाखल

रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वनिता गावंडे यांनी पतीशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर दोघांनीही मुलांकडे चौकशी केली असता, मोठी मुलगी शिकवणीला गेल्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजता भाडेकरू असलेल्या दोन मुली टीव्ही पाहण्यासाठी घरात आल्याचे समोर आले. त्यावेळी घरातील लहान मुलगी टीव्ही पाहत होती, तर वनिता गावंडे यांच्या बहिणीच्या मुलाला एका मुलीने घराबाहेर नेले होते. दरम्यान, घरातील कपाट उघडल्याचा आवाज ऐकू आल्याचे त्याने सांगितले. तसेच, “तुला घड्याळ घेऊन देतो, आम्ही घरात आलो होतो हे तुझ्या मावशीला सांगू नको,” असेही त्या मुलींनी त्याला सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर संबंधित मुलींना विचारणा करण्यात आली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरून शहर पोलिसांनी दोन्ही संशयित अल्पवयीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top