Mahabreaking

[breaking_news]

MLA Nitin Deshmukh :पाठीवर पती, रुग्णालय बेफिकीर; आमदार नितीन देशमुखांनी प्रशासनाला धारेवर धरले

MLA Nitin Deshmukh :सर्वोपचार रुग्णालयात व्हीलचेअर आणि स्ट्रेचर यांसारख्या अत्यावश्यक सुविधांच्या अभावामुळे एका विवश महिलेला ‘ब्रेन स्ट्रोक’ आलेल्या पतीला पाठीवर उचलून उपचारासाठी रुग्णालयात फिरावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची दखल घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक देत अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांना जाब विचारला. तसेच तीन ते चार दिवसांत व्हीलचेअर, स्ट्रेचर आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.

MLA Nitin Deshmukh

तीन दिवसांत सुविधा द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील; आमदार देशमुखांचा इशारा

अकोला : सर्वोपचार रुग्णालयात व्हीलचेअर आणि स्ट्रेचर यांसारख्या अत्यावश्यक सुविधांच्या अभावामुळे एका विवश महिलेला ‘ब्रेन स्ट्रोक’ आलेल्या पतीला पाठीवर उचलून उपचारासाठी रुग्णालयात फिरावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची दखल घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक देत अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांना जाब विचारला. तसेच तीन ते चार दिवसांत व्हीलचेअर, स्ट्रेचर आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.

आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता कार्यालयात भेट देऊन रुग्णालयातील व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. संबंधित महिला आपल्या पतीला पाठीवर घेऊन फिरत असताना तेथे उपस्थित वार्डबॉय व इतर कर्मचारी काय करत होते, असा संतप्त सवाल आमदार देशमुख यांनी उपस्थित केला.

यावेळी अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचेही आमदार देशमुख यांनी नमूद केले. तसेच रुग्णालयातील विविध वार्डांमध्ये खाटांची कमतरता असल्याने गंभीर रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक शंकर लंगोटे, सुरेंद्र विसपुते, अतुल पवनिकर, जिल्हासंघटक भूषण भिरड, तालुकाप्रमुख संजय भांबेरे, ज्ञानेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर म्हैसणे, शहरप्रमुख आशिष गावंडे (अकोला पश्चिम), राहुल कराळे (अकोला पूर्व), मनपा गटनेते विजय इंगळे, नगरसेवक अभय खुमकर, योगेश गोतमारे, रामभाऊ आमले, अभिषेक खरसाडे, दत्ता पाटील, सोनू औतकार, हर्षल पाटील, साकलेन खान पठाण, गजानन फुंडकर, अश्विन कपले, दीपक लोनाग्रेकर, आस्तिक चव्हाण, प्रज्वल बोंद्रे, ओम गावंडे, विलास तंवर, नरेंद्र सावळे, विकेश हिरणवाडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

 

दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

संबंधित महिलेच्या पतीची प्रकृती गंभीर असतानाही मदतीसाठी कर्मचारी पुढे आले नाहीत. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह संबंधित सुरक्षा रक्षकांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली.

 

स्वच्छतेवरही प्रश्नचिन्ह

जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छतेसाठी कंत्राटदाराला लाखो रुपयांचे मानधन दिले जात असतानाही परिसरातील स्वच्छतेची स्थिती अत्यंत खराब असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केला. तसेच पार्किंग कंत्राटाची मुदत संपल्यानंतरही वाहनधारकांकडून अनधिकृतपणे शुल्क वसूल केले जात असल्याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.या घटनेमुळे सर्वोपचार रुग्णालयातील सुविधांचा अभाव आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top