soybean crop: चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम तुलंगा खुर्द येथे रागाच्या भरात जावयाने सासूच्या साेयाबीन सुडीला आग लावली. यामध्ये साेयाबीन जळून खाक झालयाने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना १६ ऑक्टाेबर राेजी घडली.या प्रकरणी चान्नी पाेलिसांनी आराेपी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

४० हजार रुपयांचे नुकसान, चान्नी पाेलिसात तक्रार दाखल
राहुल सोनोने
दिग्रस बू : चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम तुलंगा खुर्द येथे रागाच्या भरात जावयाने सासूच्या साेयाबीन सुडीला आग लावली. यामध्ये साेयाबीन जळून खाक झालयाने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना १६ ऑक्टाेबर राेजी घडली.या प्रकरणी चान्नी पाेलिसांनी आराेपी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लिलाबाई हरिदास ढोरे यांनी पाेलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटने आहे की, जावइ शिवशंकर लांडे हे दारू पिवुन त्रास देत असल्याने मुलगी ज्योती ही दोन महीन्यापासुन त्यांच्याजवळच आहे.त्यांच्या मुलीने सोबत जाण्यास नकार दिल्याने जावयाने वाद करून शिवीगाळ केली सोबत न आल्यास तर मारून टाकीन अशि धमकी दिली. याबाबत मंगेश मेतकर याने फोनद्वारे तुमच्या शेतातील सोयाबिनची लावलेली गंजी पेटवून दिल्याची माहिती मिळाली आहे .या मध्ये सोयाबिनची गंजी अंदाजे १५ क्विंटल व त्यावर ताडपऱ्या किंमत अंदाजे ४० हजार रुपये नुकसान केले आहे.सबंधित व्यक्तीवर कारवाई करून मला आर्थिक नुकसानं देण्यात यावी अशी मागणी या तक्रारीमधून करण्यात आली आहे. या प्रकरणी आराेपी जावयाविरुद्ध चान्नी पाेलिसांनी कलम नुसार ३५२,३५१,३२४,३२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

