Mahabreaking

[breaking_news]

 Kiran Sarnaik : खेळातून विद्यार्थी घडवून उद्याची सक्षम पिढी घडविण्याचे कार्य प्रशंसनीय : ॲड. किरण सरनाईक

Kiran Sarnaik : आजच्या गतिमान आणि बदलत्या काळात विद्यार्थी व्यायाम व खेळांपासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र, कुंभारी यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी बलशाली, आत्मविश्वासपूर्ण व संस्कारक्षम व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ग्रीष्मकालीन शिबिर कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अमरावती विभागीय शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी काढले.

 Kiran Sarnaik

 कुंभारीत दहा दिवसीय ग्रीष्मकालीन बालसंस्कार व क्रीडा शिबिराचे थाटात उद्घाटन

 संजय तायडे

बोरगाव मंजू : आजच्या गतिमान आणि बदलत्या काळात विद्यार्थी व्यायाम व खेळांपासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र, कुंभारी यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी बलशाली, आत्मविश्वासपूर्ण व संस्कारक्षम व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ग्रीष्मकालीन शिबिर कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अमरावती विभागीय शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी काढले.

जय बजरंग व्यायाम शाळा, जय बजरंग विद्यालय कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आयोजित दहा दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी बालसंस्कार व क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष नारायणराव गावंडे होते. यावेळी शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक, जय बजरंग मंडळाचे संचालक प्रकाशभाऊ बिडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी प्रमोद टेकाडे, डॉ. रामेश्वर बरगट, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त श्रीकृष्ण बिडकर, गजानन इंगळे, वासुदेव आगळे, दीपक बिडकर, भास्कर सोनवणे, गजानन म्हैसने, गौतम पडखामोल, रामाभाऊ जोगतळे, गजानन बिडकर, वासुदेव बिडकर, सुरेश बोचरे, विलास इंगळे आदी उपस्थित होते.

हे शिबिर १ जून ते १० जूनदरम्यान कुंभारी येथील जय बजरंग विद्यालयात आयोजित करण्यात आले असून, शिबिरामध्ये विविध शालेय क्रीडा प्रकारांसह संस्कारवर्गाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षक म्हणून प्रा. विश्वास जाधव, जानराव आगळे, बबलू तायडे, मोहन भातरकर, संजय मैंद, विजय पचारे, प्रणव बहादुरे, राजेश सातपुते व संतोष तायडे मार्गदर्शन करीत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे २०० विद्यार्थी-खेळाडू या शिबिरात सहभागी झाले आहेत. शिबिर पूर्णतः मोफत असून, सहभागी विद्यार्थ्यांना भोजन, दोन वेळचा नाश्ता तसेच लोअर व टी-शर्ट स्वरूपातील गणवेश आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रशिक्षणामध्ये योग, व्यायाम, कवायत, समूहगान, देशी खेळ, संस्कार प्रबोधन व ज्ञानामृत सत्रांचा समावेश आहे. तसेच धनुर्विद्या, योग, नेटबॉल, थ्रोबॉल आणि मल्लखांब यांसारख्या शासनमान्य खेळांचे प्रशिक्षण नामांकित प्रशिक्षकांकडून दिले जात आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. श्रीराम पालकर यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी जय बजरंग परिवार, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top