House Catches Fire :स्थानिक सिद्धार्थ नगर परिसरातील एका घराला विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील साहित्य जळून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला.

सिद्धार्थ नगरमध्ये शेजाऱ्यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली
बोरगाव मंजू : स्थानिक सिद्धार्थ नगर परिसरातील एका घराला विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील साहित्य जळून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील सूर्यकांत मांगे यांच्या घरात विद्युत शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. या आगीत घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
घराला आग लागल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न केले. भरवस्तीत आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आग वेळेत आटोक्यात आणली नसती तर शेजारील घरांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

