Chief Justice :सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारा वकील राकेश किशाेर आणि संविधान संपविण्याची भाषा करणारा वकील अनिल मिश्रा यांच्याविरुद्ध देशद्राेहाचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यात १७ ऑक्टाेबर राेजी भीम आर्मीच्या वतीने जनआक्राेश माेर्चा काढण्यात आला. भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात हा माेर्चा काढण्यात आला.
भीम आर्मीने बुलढाण्यात काढला जनआक्राेश माेर्चा : विविध मागण्यांचे दिले निवेदन
बुलढाणा : सरन्यायाधिश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारा वकील राकेश किशाेर आणि संविधान संपविण्याची भाषा करणारा वकील अनिल मिश्रा यांच्याविरुद्ध देशद्राेहाचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्यात १७ ऑक्टाेबर राेजी भीम आर्मीच्या वतीने जनआक्राेश माेर्चा काढण्यात आला. भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात हा माेर्चा काढण्यात आला.
जिजामाता प्रेक्षागार मैदानावर झालेल्या सभेला संबोधित करताना येथून पुढे होणारे अन्याय, अत्याचार सहन केले जाणार नाही, असा इशारा सरकारला देण्यात आला. सुरुवातीला संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. सुरेश जाधव, अनंता मिसाळ, कैलास खिल्लारे, शैलेश वाकोडे, प्रकाश धुंदळे, संतोष वानखडे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. मल्हारी गवई यांनी मनुवादी विचारसरणीवर आधारित गीत सादर केले. दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाइन, कारंजा चौक या मार्गाने घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सरकार आणि मनुवादी धोरणा राबविणाऱ्यांवर चौफेर टिका करीत सतीश पवार म्हणाले, दोन्ही वकील मनोविकृत आहेत. यापूर्वी सर्वोच्च पदावर बसलेले हिदायतऊल्ला खान यांच्यावरही हल्ला झाला होता, याचाही दाखला त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित वर्गाला जगण्याचा अधिकार दिला. आजही बुरसटलेले विचार कायम आहेत. त्यातून मागासवर्गीयांवर अन्याय, अत्याचार केला जात आहेत. यापुढे आम्ही शांत बसणार नाही. आमच्यावरील अन्याय, अत्याचार खपवून न घेता प्रतिकार करण्याची ताकद आमच्यात आहे, हे देखील सतीश पवार यांनी ठणकावून सांगितले.



