Mahabreaking

[breaking_news]

 illegal liquor: अवैध दारू विक्री प्रकरणी पोलिसांची कारवाई; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

illegal liquor: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या अवैध दारू विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी देऊळगाव राजा पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एक आरोपीस अटक करण्यात आली आहे.

illegal liquor

देऊळगाव राजा : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या अवैध दारू विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी देऊळगाव राजा पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एक आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, देऊळगाव राजा–चिखली रोडवरील दगडवाडी फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचून देवदास फकीरबा निकम (वय २७ वर्षे, रा. जवळखेड) या व्यक्तीस पकडले. त्याच्या ताब्यातून तीन बॉक्स देशी दारू (१८० एमएलच्या १४४ बाटल्या) असा १२,९६० रुपयांचा माल आणि ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ४७,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी मनीषा कदम आणि पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे व पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे यांच्या पथकाने केली.या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top