Mahabreaking

[breaking_news]

Incidents of Setting Fire : झाडांना आग लावून नष्ट करण्याचे प्रकार; पर्यावरणप्रेमींची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Incidents of Setting Fire : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण रस्त्यालगत असलेल्या नैसर्गिक तसेच वृक्षारोपणातून वाढलेल्या झाडांना आग लावून नष्ट करण्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असून सार्वजनिक वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी जिल्हाधिकारी, अकोला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Incidents of Setting Fire

बाळापूर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यालगतच्या वृक्षांचे संरक्षण करण्याची मागणी

ज़ाकिर अहमद

बाळापूर : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण रस्त्यालगत असलेल्या नैसर्गिक तसेच वृक्षारोपणातून वाढलेल्या झाडांना आग लावून नष्ट करण्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असून सार्वजनिक वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी जिल्हाधिकारी, अकोला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दि. २२ मे २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात अर्जदार अनंतराव नारायण फाटे, जयश्री अनंतराव फाटे, अनिल श्रीधरराव गावंडे आणि गजानन शामराव थोरात यांनी बाळापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये घडणाऱ्या या प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

निवेदनानुसार, शेतकरी शेतधुरे जाळताना अनेकदा लगतच्या सरकारी झाडांनाही आग लागून ती नष्ट होत आहेत. तसेच काही ठिकाणी जाणीवपूर्वक झाडांना आग लावण्याचे प्रकार होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ग्रामीण भागातून प्रवास करताना अशा घटना वारंवार निदर्शनास येत असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींनी नमूद केले आहे.

विशेषतः उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने रस्त्यालगतची झाडे मोठ्या धोक्यात आली आहेत. त्यामुळे तहसीलदार, बाळापूर यांच्या माध्यमातून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सार्वजनिक वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

“वृक्ष हेच पर्यावरणाचे खरे रक्षक असून त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे,” असेही अर्जदारांनी आपल्या निवेदनात नमूद करत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top