Students of Mauli School of Scholars :संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा येथील माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेसह तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळेतील विद्यार्थीनी भक्ती ज्ञानेश्वर खानझोड आणि विद्यार्थी आर्यन नितेश पुंडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या १९व्या सीनियर नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड व ब्राँझ पदक पटकावले.

भोपाल येथे पार पडलेल्या डॉजबॉल स्पर्धेत गोल्ड व ब्राँझ पदकांची कमाई
संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा येथील माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेसह तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळेतील विद्यार्थीनी भक्ती ज्ञानेश्वर खानझोड आणि विद्यार्थी आर्यन नितेश पुंडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या १९व्या सीनियर नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड व ब्राँझ पदक पटकावले.
ही स्पर्धा मध्य प्रदेशातील भोपाल येथे १८ ते २१ मे दरम्यान डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, तामिळनाडू आणि छत्तीसगड या बलाढ्य संघांना पराभूत केले.
स्पर्धेत मुलींच्या गटात तसेच मिक्स टूर्नामेंटमध्ये महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले. तर मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने तृतीय क्रमांक मिळवत ब्राँझ पदकाची कमाई केली. या यशस्वी संघात पंचाळा येथील माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी-विद्यार्थिनी भक्ती ज्ञानेश्वर खानझोड आणि आर्यन नितेश पुंडे यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक ज्ञानेश्वर दादा पाटील, मुख्याध्यापिका मृणालीताई पाटील, क्रीडा प्रमुख विश्वजीत ठाकूर सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिकच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट खेळाडू म्हणून नाव कमवावे,” अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्र संघाच्या कामगिरीचेही कौतुक केले.

