Mahabreaking

[breaking_news]

Five Accused :नाफेडचा २७० क्विंटल हरभरा लंपास करणारे पाच आरोपी जेरबंद

Five Accused : धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालमाती परिसरातून नाफेडचा २७० क्विंटल हरभरा भरलेला ट्रक लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करीत पाच आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ट्रकसह १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस तपासातील तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी ठरली.

Five Accused

 २०० किमी परिसरातील CCTV तपासातून मोठा पर्दाफाश; ट्रकसह १८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

 गजानन तिडके

बुलढाणा :  धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालमाती परिसरातून नाफेडचा २७० क्विंटल हरभरा भरलेला ट्रक लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करीत पाच आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ट्रकसह १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस तपासातील तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी ठरली.

याप्रकरणी अप क्रमांक १६३/२०२६ अंतर्गत कलम ३१६ (३) बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राजेंद्र आनंदराव जंगले (रा. थड, ता. मोताळा) हे लालमाती-किण्होळा येथील नाफेड खरेदी केंद्राचे अध्यक्ष असून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान्य वखार महामंडळ, मलकापूर येथे पाठविण्याचे काम करतात.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी लकी ट्रान्सपोर्टमार्फत आलेल्या ट्रक (एमएच ४३ यू ५२९०) मध्ये २७० क्विंटल हरभरा, म्हणजेच ५० किलोचे ५४० कट्टे, सरकारी हमीभावानुसार सुमारे १५ लाख ८६ हजार २५० रुपयांचा माल मलकापूर येथील वखार महामंडळात पोहोचविण्यासाठी देण्यात आला होता. मात्र चालकाने विश्वासघात करत ट्रक नियोजित ठिकाणी न नेता हरभऱ्याचा अपहार केल्याची तक्रार दाखल झाली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने गुन्हा उघड करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये व पथकाने समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान सुमारे २०० किलोमीटर परिसरातील ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. तसेच गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून आरोपींचा माग काढण्यात आला. संशयित आरोपी मलकापूर येथे आढळून आल्यानंतर चौकशीदरम्यान ट्रक चालक शेख आमीन शेख जमील याने गुन्ह्याची कबुली दिली.यानंतर पोलिसांनी तेल्हारा येथे छापा टाकून गुन्ह्यातील ट्रक, ११८.३५ क्विंटल हरभरा आणि हरभरा विक्रीतून मिळालेली तीन लाख रुपयांची रोकड असा एकूण १८ लाख ९१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात शेख आमीन शेख जमील (३३), शेख समीर शेख सलीम (२७), शेख सादिक शेख नुरमोहम्मद (२४), मोहम्मद मुस्तकीन मोहम्मद मुशीर शेख (३४) आणि सोहेल खान ऊर्फ शोएब युनूस खान (२३, सर्व रा. मलकापूर) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास धामणगाव बढे पोलीस स्टेशन करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top