Mahabreaking

[breaking_news]

Mahindra Pickup :घरासमोरून महिंद्रा पिकअपसह वेल्डिंग गॅस सिलेंडर लंपास ; ५.१० लाखांचा ऐवज लंपास

Mahindra Pickup :घरासमोर उभी असलेली महिंद्रा पिकअप आणि त्यामध्ये ठेवलेले वेल्डिंग कामासाठीचे गॅस सिलेंडर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीतील एकूण ऐवजाची किंमत सुमारे ५ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mahindra Pickup

देऊळगावमहीतील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : घरासमोर उभी असलेली महिंद्रा पिकअप आणि त्यामध्ये ठेवलेले वेल्डिंग कामासाठीचे गॅस सिलेंडर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना देऊळगाव मही येथे समोर आली आहे.  या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीतील एकूण ऐवजाची किंमत सुमारे ५ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी दिनकर नामदेव खेत्रे (वय ४६), व्यवसाय वेल्डिंग काम, रा. देऊळगावमही, ता. देऊळगाव राजा यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांची महिंद्रा कंपनीची एफबी मॉडेलची पांढऱ्या रंगाची पिकअप (क्रमांक एमएच-४६-एएफ-५००१) ही घरासमोर उभी करण्यात आली होती. या वाहनात वेल्डिंग कामासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन सीओ₂ गॅस सिलेंडरच्या टाक्याही ठेवण्यात आल्या होत्या.

१८ मे रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी सदर वाहन सुरू करून घरासमोरूनच पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरीस गेलेल्या पिकअप वाहनाची अंदाजे किंमत ५ लाख रुपये तर दोन वेल्डिंग गॅस सिलेंडरची किंमत सुमारे १० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध कायम गुन्हा क्रमांक २२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत असून गुन्हा नोंदणीची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे यांनी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top