Drug sellers : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) यांनी देशात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या इंटरनेट फार्मसी व ऑनलाईन औषध विक्रीविरोधात बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला देऊळगाव राजा शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील औषध विक्रेत्यांनी आपल्या मागण्यांसाठी मूक मोर्चाही काढला.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) यांनी देशात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या इंटरनेट फार्मसी व ऑनलाईन औषध विक्रीविरोधात बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला देऊळगाव राजा शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील औषध विक्रेत्यांनी आपल्या मागण्यांसाठी मूक मोर्चाही काढला.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून सुरू असलेली ऑनलाईन औषध विक्री ही औषध व्यवसायासाठी घातक ठरत असून संबंधित नियमावली आणि अधिसूचना लागू करण्याबाबत केंद्र शासन, संबंधित मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदने देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारेही मागण्या मांडण्यात आल्या; मात्र शासन व प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदन पाठवून ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भातील नियम कठोर करण्याची मागणी केली आहे. बेकायदेशीर ई-पोर्टलच्या माध्यमातून औषध विक्रीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी संघटनेकडून सातत्याने करण्यात आली आहे. बुधवार, दि. २० मे रोजीच्या बंदमध्ये राज्यातील व जिल्ह्यातील औषध विक्रेते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या बंदमध्ये श्रीराम पऱ्हाड, शरद डोईफोडे , सिध्देवर मिनासे, हेमंत वाटाणे, गजानन कुलकर्णी, विष्णू आघाव, गणेश डफळे, स्वप्नील रामाणे, गजानन मुंढे, सुदर्शन गिते, पंकज मांडोत, विनय जाधव, राजेश झोरे यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला.

