Sale of medicines: जिल्ह्यात नशेसाठी कफ सिरपचा गैरवापर वाढत असल्याचे समोर येताच अन्न व औषध प्रशासन विभागाने तात्काळ कारवाई केली. आयुक्त गजानन घिरके यांनी दि. १५ ऑक्टोबर रोजी विशेष पथकासह डोणगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी अचानक भेट देऊन औषध दुकानांची झाडाझडती घेतली. यादरम्यान दोन मेडिकल मध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषध विक्री होत असल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

तात्काळ विक्रीबंदीचे आदेश
डोणगाव : जिल्ह्यात नशेसाठी कफ सिरपचा गैरवापर वाढत असल्याचे समोर येताच अन्न व औषध प्रशासन विभागाने तात्काळ कारवाई केली. आयुक्त गजानन घिरके यांनी दि. १५ ऑक्टोबर रोजी विशेष पथकासह डोणगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी अचानक भेट देऊन औषध दुकानांची झाडाझडती घेतली. यादरम्यान दोन मेडिकल मध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषध विक्री होत असल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान माहिती मिळताच अनेक मेडिकल दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली, तरीही पथकाने तपासणी सुरू ठेवली. तपासणीअंती डोणगाव दोन दुकानांमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावर आयुक्त घिरके यांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही मेडिकलची विक्री बंद करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे परिसरातील इतर मेडिकल व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सदर पथकाने मेहकर येथील एक मेडिकल, देऊळगाव राजा येथील दोन मेडिकल आणि देऊळगाव मही येथील तीन मेडिकल दुकानांचीही तपासणी करून आवश्यक ती कारवाई केली आहे. सर्व संबंधित मेडिकल दुकानदारांना “कारणे दाखवा नोटीस” देण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

