Mahabreaking

[breaking_news]

Four oxen brought :कुरणखेड येथे कत्तलीसाठी आणलेल्या चार बैलांना दिले जीवनदान

Four oxen brought : कुरणखेड येथे चार बैलांना कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले असताना पोलिसांनी कारवाई करीत त्यांयना जीवनदान दिले.  या प्रकरणात एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

Four oxen brought

‘कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचा’ आरोप; बोरगाव मंजू पोलिसांची कारवाई

 बोरगाव मंजू : कुरणखेड येथे चार बैलांना कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले असताना पोलिसांनी कारवाई करीत त्यांयना जीवनदान दिले.  या प्रकरणात एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुदीप राऊत  यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख नजीर शेख रहेमान  यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, १८ मे रोजी रात्री पोलीस पथक परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुरणखेड येथील एका गोठ्यात गोवंशीय जनावरे कथितपणे कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आली आहेत. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी भेट दिली. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित गोठ्यात चार गोवंशीय बैल लहान दोरीने बांधून ठेवलेले आढळले. जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था नसल्याचा तसेच त्यांना त्रासदायक परिस्थितीत ठेवण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. घटनास्थळी उपस्थित व्यक्तींना जनावरांबाबत कागदपत्रांची विचारणा करण्यात आली असता आवश्यक दाखले उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. कारवाईदरम्यान अंदाजे एक लाख रुपये किमतीचे चार गोवंशीय बैल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले. यामध्ये विविध रंग व वयोगटातील बैलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३४४/२०२६ दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ सह पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलिस कर्मचारी सुदिप राऊत करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top