Mahabreaking

[breaking_news]

Shiv Sena :मतदान पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे ;  प्रतापराव जाधव यांचे आवाहन

Shiv Sena : राजकारण हा बुद्धीचा खेळ असून तिथे सर्व डावपेच हे बुद्धीने फेकावे लागतात .तुम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते राजकारणामध्ये तरबेज आहात. आपण सर्वांनी आपल्या परीने निवडणूका लढलेल्या आहेत. सध्या निवडणूक विभागातर्फे सुरू असलेल्या मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जागरूक राहून मतदारांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज मेहकर येथे शेतकरी भवनातआयोजित शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.

Shiv Sena
मेहकर : राजकारण हा बुद्धीचा खेळ असून तिथे सर्व डावपेच हे बुद्धीने फेकावे लागतात .तुम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते राजकारणामध्ये तरबेज आहात. आपण सर्वांनी आपल्या परीने निवडणूका लढलेल्या आहेत. सध्या निवडणूक विभागातर्फे सुरू असलेल्या मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जागरूक राहून मतदारांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज मेहकर येथे शेतकरी भवनातआयोजित शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.
माजी आमदार संजय रायमुलकर प्रमुखाचे ते म्हणून उपस्थित होते.निवडणुकीमध्ये रणनीती काय असते हे आपल्या सर्वांनाही माहिती आहे. प्रत्येकाने ती रणनीती वेळेवर आखून निवडणूक जिंकण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे आवाहन करून मंत्री जाधव कुठे म्हणाले की, निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण तयारी करतो. पण पूर्वतयारी आधीच करावी लागते .मेहकर मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आपण १९९० पासून निवडणुका लढलो आणि जिंकलो. शिवसेना हा आधी मोठा भाऊ होता आणि भाजप हा लहान. आता भाजप मोठा भाऊ झाला आहे. विधानसभेमध्ये २८८ जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक स्थान मिळायचे. आता भाजपा मोठा पक्ष झाला आहे. शिवसेना हा तरुणाचा पक्ष पाहिला जातो युवकांची चांगल्या मोठ्या प्रमाणात पक्षांमध्ये गर्दी असते. काम करतात युवकांना चांगल्या संधी पक्षामध्ये काम करत असताना मिळत असतात. मतदार याद्यांमध्ये मतदार नाव टाकणे ,मतदार वगळणे याबाबत बारकाईने लक्ष घालून पक्षाचे काम केले पाहिजे. पक्ष वाढवला पाहिजे. मतदार यादीचे तीन विभागांमध्ये आपण काम केले पाहिजे , याबाबत सांगताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, आपल्या पक्षाचे कट्टर मतदान, दुसरे कट्टर विरोधक आणि तटस्थ मतदान तटस्थ मतदान.यामध्ये आपण तटस्थ मतदार आपल्याकडे वळवले पाहिजे. तर निवडणूक जिंकणे सोपे होते. येत्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आपल्याला लढायच्या आहेत.
माजी आमदार संजय रायमुलकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव यांनी आपल्या भाषणातून मतदार यादी पुनर्नरीक्षण प्रक्रियेमध्ये पक्षाच्या बी एल ए यांनी करावयाच्या कामगिरीबद्दल सांगून पक्षाच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख संजय सोनार, वैभव थोरात शिवसेना सचिव पश्चिम विदर्भ प्रमुख, जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, संजय अगलदरे, उपजिल्हाप्रमुख किसनराव बळी , आशाताई झोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई मस्के उपस्थित होत्या. प्रास्ताविक जिल्हा संघटक दिलीपबापू देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन जयचंद बाठीया .तालुकाप्रमुख सुरेश वाळू कर, लोणार तालुकाप्रमुख भगवान सुलताने, युवा सेनेचे भूषण घोडे ,नीरज रायमुलकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top