Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

four lakh farmers : जिल्ह्यातील चार लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी हाेणार गाेड!

four lakh farmers : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडे २८९ काेटी २७ लाख रुपयांची मदत निधीची मागणी केली हाेती. जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ९०८ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे, नुकसानामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.१५ ऑक्टाेबर राेजी मदत निधी वितरणीत करण्याविषयी शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

Diwali will be a blessing for four lakh farmers
२८९ काेटी २७ लाख रुपयांची मदत हाेणार खात्यात जमा : सप्टेंबर महिन्यातील नुकसानासाठी मदत

बुलढाणा : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडे २८९ काेटी २७ लाख रुपयांची मदत निधीची मागणी केली हाेती. जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ९०८ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे, नुकसानामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.१५ ऑक्टाेबर राेजी मदत निधी वितरणीत करण्याविषयी शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. अनेक तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाउस झाला हाेता. त्यामुळे, नदी, नाल्यांना पूर आल्याने पिके वाहून गेली हाेती. साेयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते.खरीप हंगामातील ३ लाख २९ हजार १५० हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. तसेच १ हजार ३२२ हेक्टवरील बागायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले हाेते. ३ हजार २२० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले हाेते. या नुकसानाचे प्रशासनाने पंचनामे करून जिल्ह्यातील ४ लाख ४ हजार ९०८ शेतकऱ्यांसाठी मदत निधीची मागणी करण्यात आली हाेती. शासनाने जिल्ह्यातील ४ लाखांवर शेतकऱ्यांसाठी २८९ काेटी २७ लाख रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. त्यामुळे, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी जमा हाेणार आहे. त्यामुळे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

काेरडवाहुसाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये मदत
काेरडवाहू शेतीसाठी दाेन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर ८ हजार ५०० रुपये, बगायतीसाठी हेक्टरी १७ हजार आणि बहु वार्षिक पिकासाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये अशी मदत मिळणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ११ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top