Shivsai School : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, शिवसाई ज्ञानपीठ व उच्च माध्यमिक विद्यालय, मासरुळ येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाची शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे.

पंडीत सावळे
मासरुळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, शिवसाई ज्ञानपीठ व उच्च माध्यमिक विद्यालय, मासरुळ येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाची शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे.
यावर्षी विद्यालयातील ५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले, तर ३२ विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले. गणित, मराठी आणि विज्ञान यांसारख्या अवघड विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यालयातील कु. कांचन समाधान पायघन हिने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. विवेक समाधान सिनकर याने ९४.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर शिवानी सुनील दांडगे, समृद्धी किरण काटोले आणि यश वसंता नरोटे यांनी प्रत्येकी ९४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. अक्षदा विजय सपकाळ हिने ९३.६० टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक पटकावला. तसेच रोहिणी सुनील नरवाडे (९३.४०%), समृद्धी ज्ञानेश्वर नरोटे (९२.६०%), यश गणेश गायकवाड (९२.६०%), समीक्षा नामदेव नरवाडे (९२.२०%), ओम कैलास भगवत (९१.६०%), शिवानी संजय वाघ (९१.६०%), शिवप्रसाद आकाश सिनकर (९१.४०%) आणि गौरव कृष्णा काटोले (९०.२०%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाला श्रेय दिले जात आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्थेच्या वतीने शिवसाई पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. दौलतराव नरवाडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व भविष्यातही असेच उज्ज्वल यश संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शाळेचे प्राचार्य प्रा. ए. बी. गुळवे सर व मुख्याध्यापिका एस. एस. नरवाडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शिवसाई शाखेचे व्यवस्थापक सुखदेव नरवाडे, कैलास सिनकर, किरण सिनकर, प्रा. विनोद गवते सर, प्रा. सुरेश अस्वार सर, प्रा. उत्तम कांबळे , प्रतीक जाधव , योगेश लोखंडे , शिक्षिका प्रीती जाधव , वैष्णवी खोलगडे , मनिषा वानरे , अंजना सपकाळ आंटी, विष्णू बोडखे, सागर भागवत, संजय कळसकर, गजानन सिनकर, प्रदीप नरवाडे आणि राहुल कारंजकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

