Mahabreaking

[breaking_news]

Deulgaon Raja High School :देऊळगाव राजा हायस्कूलची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

Deulgaon Raja High School :दर्जेदार शिक्षणासह बदलत्या काळातील आव्हाने स्वीकारणारा विद्यार्थी घडविण्याचा वारसा जपणाऱ्या देऊळगाव राजा हायस्कूलने यंदाही आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

Deulgaon Raja High School

 अमृता माधव शिंदे 98 टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम

गजानन तिडके

देऊळगाव राजा : दर्जेदार शिक्षणासह बदलत्या काळातील आव्हाने स्वीकारणारा विद्यार्थी घडविण्याचा वारसा जपणाऱ्या देऊळगाव राजा हायस्कूलने यंदाही आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल तब्बल 97.28 टक्के लागला असून गुणवत्तापूर्ण यशाची अखंड परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. विद्यालयातून एकूण 515 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 501 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 97.28 टक्के इतका लागला आहे. या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यालयातील अमृता माधव शिंदे हिने 98 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

विद्यालयातील   अमृता माधव शिंदे — 98.00 टक्के, यश साहेबराव शेजुळ — 97.80 टक्के,  अपूर्वा भगवान खरात — 97.40 टक्के,  स्नेहल विनोद गरड — 96.60 टक्के ,आदित्य प्रदीप राठोड — 96.40 टक्के असे गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे आदित्य प्रदीप राठोड याने गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले आहे. तसेच विद्यालयातील तब्बल 43 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून शाळेच्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. देऊळगाव राजा हायस्कूलचा हा निकाल सर्वोत्कृष्ट, दर्जेदार आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे. यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून देऊळगाव राजा शिक्षण संस्था संचालक मंडळाच्या वतीनेही सर्व गुणवंतांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच यशस्वी व समर्पित कार्यासाठी शिक्षकवृंदाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top