District-level Review :महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या बैठकीत महिला व बालकांच्या संरक्षण, पुनर्वसन, शिक्षण, आरोग्य आणि कल्याणाशी संबंधित विविध योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बाल संरक्षण व महिला सक्षमीकरणासाठी संयुक्त कृतीची गरज; आढावा बैठकीत चर्चा
बुलढाणा : महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या बैठकीत महिला व बालकांच्या संरक्षण, पुनर्वसन, शिक्षण, आरोग्य आणि कल्याणाशी संबंधित विविध योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महिला व बाल विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या योजनांची अंमलबजावणी, बाल संरक्षण विषयक उपक्रम तसेच विविध विभागांमधील समन्वय यांचा यावेळी आढावा घेण्यात आला. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागांनी परस्पर समन्वय वाढवून संयुक्तपणे कार्य करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, शिक्षण व आरोग्यविषयक उपक्रम अधिक परिणामकारकपणे राबविण्यावर विशेष भर देण्यात आला. महिला व बालकांशी संबंधित प्रश्नांवर संवेदनशीलतेने कार्य करून योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही बैठकीत करण्यात आले. बैठकीचे सचिव म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल दिघोळे यांनी कामकाज पाहिले. बैठकीच्या शेवटी त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांचे आभार मानले.

