Mahabreaking

[breaking_news]

Inter-state gang of robbers :समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी गजाआड

Inter-state gang of robbers : रोख रक्कम घेवून जात असलेल्या गुजरातमधील एकाला समृद्धी महामार्गावर दोन वाहनातून आलेल्या दहा ते बारा जणांनी लुटल्याची धक्कादायक घटना दि. २ मे रोजी सकाळी घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करीत आंतराज्य दरोडेखोरांची टोळी बीड जिल्ह्यातून जेरबंद केली आहे.  या कारवाईत ८ आरोपींना अटक करण्यात आली असून पिस्टल, काडतुसे, रोख रक्कम, वाहने व मोबाईल असा एकूण १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Inter-state gang of robbers

 स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; आठ आरोपींना बीड जिल्ह्यातून अटक, १२.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : रोख रक्कम घेवून जात असलेल्या गुजरातमधील एकाला समृद्धी महामार्गावर दोन वाहनातून आलेल्या दहा ते बारा जणांनी लुटल्याची धक्कादायक घटना दि. २ मे रोजी सकाळी घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करीत आंतराज्य दरोडेखोरांची टोळी बीड जिल्ह्यातून जेरबंद केली आहे.  या कारवाईत ८ आरोपींना अटक करण्यात आली असून पिस्टल, काडतुसे, रोख रक्कम, वाहने व मोबाईल असा एकूण १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सिनेस्टाईल पाठलाग करीत पाच दरोडेखोरांना केले जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अंढेरा पोलिसांची कारवाई 

या प्रकरणी फिर्यादी अभयसिंह आनंदसिंह वाघेला (वय ३२, रा. लवाना, ता. लाखणी, जि. बनासकाठा, गुजरात) यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दि. २ मे रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता ते त्यांच्या मालकाच्या धान्य व्यापारातील १२ लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओ वाहनाने नागपूरहून गुजरातकडे समृद्धी महामार्गाने जात होते. दुसरबीड टोलनाक्याजवळील पुलावर वाहनाच्या टायरमधील हवा तपासत असताना, मागून आलेल्या बोलेरो व इनोव्हा या दोन वाहनांमधून आलेल्या १० ते १२ जणांनी त्यांना मारहाण केली व पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांची स्कॉर्पिओ (किंमत अंदाजे ८ लाख) आणि १२ लाखांची रोकड लुटून नेली. त्यानंतर फिर्यादीला जालन्याच्या जंगल परिसरात सोडून आरोपी फरार झाले.

robbery

या घटनेनंतर किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विविध स्त्रोतांद्वारे माहिती गोळा केल्यानंतर आरोपी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अंबा साखर कारखाना परिसरात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत मोठ्या धाडसाने कारवाई केली आणि आंतरराज्य टोळीतील ८ आरोपींना अटक केली. या टोळीतील आरोपी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि जम्मू-काश्मीर या राज्यांतील असल्याचे समोर आले आहे.

अटक केलेल्या आरोपींकडून १ लाख ८० हजार रुपये रोख, एक देशी बनावटीची पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, इनोव्हा व बोलेरो वाहने, मोबाईल तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर  पोउपनि प्रताप बाजड, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, शरद गिरी, दिगंबर कपाटे, गणेश पुरुषोत्तम पाटील, पुरुषोत्तम आघाव, पोकॉ. अमोल अंभोरे, गजानन गोरले, मनोज खरडे, चापोहेकॉ. सुरेश भिसे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा. पोहेकॉ. राजू आडवे, पोकॉ. ऋषी खंडेराव तांत्रीक विष्लेषण विभाग, बुलढाणा यांनी केली. सदर कार्यवाहीमध्ये पोनि. शिवाजी बंटेवाड, पोह  दिलीप चंद्रभान गित्ते, पोह  रामचंद्र परशुराम केकाण, पोह  गोविंद व्यंकटी भताने यांनीही सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top