Mahabreaking

[breaking_news]

Deulgaon Raja High School :देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

Deulgaon Raja High School : दर्जेदार शिक्षणासह बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारणारा विद्यार्थी घडवण्याचा वारसा जपणाऱ्या देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान, कला व एच.एस.व्ही.सी. विभागाचा फेब्रुवारी 2026 चा निकाल जाहीर झाला असून, नेहमीप्रमाणे यंदाही 100 टक्के गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखण्यात आली आहे.

Deulgaon Raja High School

देऊळगाव राजा : दर्जेदार शिक्षणासह बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारणारा विद्यार्थी घडवण्याचा वारसा जपणाऱ्या देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान, कला व एच.एस.व्ही.सी. विभागाचा फेब्रुवारी 2026 चा निकाल जाहीर झाला असून, नेहमीप्रमाणे यंदाही 100 टक्के गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखण्यात आली आहे.

विज्ञान विभागात 137 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व 137 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक कु. मानसी रुस्तुम खैरे व कु. कृत्तिका कल्पेश कुलकर्णी (87.50 टक्के), द्वितीय क्रमांक संस्कृती सुदर्शन अक्करबोटे (87 टक्के) आणि तृतीय क्रमांक कु. वर्षा ज्ञानदेव जगताप (82.67 टक्के) यांनी मिळवला आहे.

कला विभागातून 46 विद्यार्थी परीक्षेस बसले असून सर्व 46 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या विभागाचाही निकाल 100 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक कु. सरला दत्तू बनकर (86.67 टक्के), द्वितीय क्रमांक कु. कोमल अनिल पवार (86.17 टक्के) आणि तृतीय क्रमांक कु. साक्षी जालिंदर मुळे (85.50 टक्के) यांनी मिळवला आहे. एच.एस.व्ही.सी. अंतर्गत इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी विभागात 15 पैकी 13 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 86.66 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक देवधर किशोर अंभोरे (75.50 टक्के), द्वितीय क्रमांक रोहित सचिन वाघमारे (66.67 टक्के) आणि तृतीय क्रमांक विशाल विकास घाडगे (66 टक्के) यांनी मिळवला आहे. तसेच क्रॉप सायन्स विभागात 15 पैकी सर्व 15 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला आहे. प्रथम क्रमांक कु. कोमल दत्ता कंकाळ (77.83 टक्के), द्वितीय क्रमांक कु. गुणी विठ्ठल वाघमारे (76 टक्के) आणि तृतीय क्रमांक कु. अश्विनी नारायण नरोडे (75 टक्के) यांनी मिळवला आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचा हा निकाल सर्वोत्कृष्ट, दर्जेदार व विद्यार्थ्यांच्या भविष्यास दिशा देणारा ठरला आहे. यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे देऊळगाव राजा शिक्षण संस्था संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top